सांगली : राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने राज्यात राष्ट्रीय रक्त धोरण राबविण्यात येत आहे. पद्मभूषण वसंतदादा पाटील, शासकीय रुग्णालय सांगली येथील रक्तपेढीमधून संबंधीत जिल्ह्यामधील रुग्णालय व नर्सिग होम्स यांना शितसाखळी पेटीमधून वाहतूक करून करुन रक्तपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे.
पद्मभूषण वसंतदादा पाटील, शासकीय रुग्णालय सांगली या संस्थेत जीवन अमृत सेवा या योजनेतंर्गत ब्लड ऑन कॉल प्रकल्प राबविण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्यासाठी इच्छुक संस्थानी दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी केले आहे.संस्थाकडुन प्रस्ताव सादर करण्याकरिता निकष पुढीलप्रमाणे आहेत. संस्था ही सोसायटी रजिस्ट्रेशन अॅक्ट १९६० किंवा विश्वस्त आणि धर्मदाय संस्था कायदा १९२० किंवा सार्वजनिक विश्वस्त संस्था नोंदणी कायदा किंवा कंपनीस अॅक्ट १९५६ या भारतीय कायद्याद्वारे किमान ३ वर्ष पूर्वीची नोंदणीकृत असावी.
आरोग्य विषयी कार्यक्रमातील तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. रक्त संक्रमण कार्यक्रमात अनुभव असलेल्या संस्थेस प्राध्यान्य देण्यात येईल. संस्था/संघटनेचे कार्यक्षेत्र-प्रस्ताव सादर करावयाच्या जिल्हामध्ये कार्यरत असावी. संस्थेने मागील ३ वर्षाचे अहवाल आधि लेखा परिक्षण अहवाल सादर करणे आवश्यक आहे.प्रस्ताव सादर करण्याबाबतची माहिती पुस्तिका पद्मभूषण वसंतदादा पाटील, शासकीय रुग्णालय सांगली येथील रक्तपेढी यांच्याकडे उपलब्ध आहे. संस्थेचा प्रस्ताव संस्थेच्या लेटर हेडवर अर्जदाराच्या सही आणि शिक्यासह आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा.
माहिती पुस्तिका मिळण्यासाठी २०० रुपये शुल्कचा धनाकर्ष अधिष्ठाता, पद्मभूषण पद्मभूषण वसंतदादा पाटील, शासकीय रुग्णालय सांगली यांच्या नावे देण्यात यावा. माहिती पुस्तिका घेऊना जाण्याचा अंतिम दिनांक २९ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून प्रस्ताव सादर करण्याचा दिनांक ३० सप्टेंबर २०२० सायंकाळी ५ वाजेपर्यंत असल्याचे . नणंदकर यांनी कळविले आहे.