सांगली : आश्वासनांची गाजरे...पाण्याचे बुडबुडे... शंभर कोटीचा लाडू आणि हवेत फुगे सोडत सोमवारी सांगली महापालिकेसमोर विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप सत्तेच्या शंभर दिवसातील कारभाराचा पंचनामा केला. महापालिकेतील भाजप सत्ताधाºयामुळे नागरी सुविधांचा बोजवारा उडालेला आहे. साथीच्या आजाराने नागरिकांचे बळी जात आहे. तरीही पारदर्शी कामाचा ढोंगीपणा सुरू असल्याचा आरोप करून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
या आंदोलनात विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, संतोष पाटील,मंगेश चव्हाण, वहिदा नायकवडी, रोहिणी पाटील, वर्षा निंबाळकर, आरती वळवडे, मदिना बारुदवाले, फिरोज पठाण, मनोज सरगर, शुभांगी सांळुखे, करण जामदार, उमेश पाटील, राष्ट्रवादीचे शेठजी मोहिते, योगेंद्र थोरात, संगीता हारगे आदी सहभागी झाले होते. भाजप सत्ताधाºयांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत हातात आश्वासनांचे गाजर दाखवत ,पाण्याचे बुडबुडे व हवेत फुगे सोडत आंदोलक सहभागी झाले होते. महापालिका सत्तेत येऊन शंभर दिवस पुर्ण झाल्यानंतर ही नागरी सुविधांबाबत काहीही केले नाही. कचरा उठाव नाही, औषध फवारणी नाही, विकास कामाचे तसेच पारदर्शी कामाचे गाजर दाखवत भाजप सत्ताधाºयांनी सत्ता मिळवली. मात्र आश्वासनांचा लाडू आरशातच दिसल्याचा आरोपही करण्यात आला.
यावेळी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर म्हणाले,भाजपाची महापालिकेत सत्ता येवून शंभर दिवस पुर्ण झाले. या कालावधीत एकही काम मार्गी लागले नाही. विकासात्मक एकही निर्णय झालेला नाही. उलट प्रशासन सत्ताधाºयांचे ऐकेना अशी स्थिती निर्माण झाल्याने शहरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासन आणि सत्ताधारी वादात उद्याने भकास झाली आहेत. कचरा उठाव ठप्प झाला आहे. साथीचे आजार पसरले आहेत. घरटी एक व्यक्ती आजारी आहे. शहर सुधारण्याचा विडा उचलणाºया भाजपला पहिल्या शंभर दिवसात नागरी प्रश्नही सोडवता आले नाही. प्रशासनावर वचक राहिला नाही. भाजपचे नेते अपयशी ठरले आहेत. नागरीकांना शंभर कोटीचा आणखी एक लाडू दाखवत आहे. जनतेसमोर हे मांडण्यासाठीच आम्ही आंदोलन केल्याचे सांगितले. नगरसेवकांची घोषणाबाजीशंभर दिवस पूर्ण झाले, सत्ताधाºयांना साधी ट्युब बसविली नाही, डेंग्यु आणि स्वाईल फ्ल्यूनी जीव नको केला, पण यांचे सोयरेसुतक नाही या भाजपवाल्यांना, रस्ते, गटारी, नाला, मंडई, कामे थांबलेली, उद्यानामधील झाडे ही वाळलेली, शंभर दिवस पुर्ण झाले सत्ताधाºयांना,अशा घोषणा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिल्या.