शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
4
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
6
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
7
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
9
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
10
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
11
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
12
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
13
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
14
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
15
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
16
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
17
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
19
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
20
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."

दिवाळीसाठी सांगली सजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 11:10 PM

सांगली : मांगल्य आणि उत्साहाचे लेणे लेऊन दारात आलेल्या दिवाळीच्या सणाचा आनंद लुटण्यासाठी सांगली नगरी सजली आहे. घरोघरी अजूनही ...

सांगली : मांगल्य आणि उत्साहाचे लेणे लेऊन दारात आलेल्या दिवाळीच्या सणाचा आनंद लुटण्यासाठी सांगली नगरी सजली आहे. घरोघरी अजूनही सणाची लगबग दिसत आहे. वसुबारसने रविवारपासून दीपोत्सवास सुरुवात झाली असली तरी, मंगळवारी नरकचतुदर्शीपासून दिवाळीचा थाट सुरू होणार आहे.सोमवारी ५ नोव्हेंबर रोजी दिवाळीतील धनत्रयोदशी हा एक महत्त्वाचा दिवस आहे. यादिवशी लक्ष्मीचे पूजन केले जाते. व्यापारी वर्गासाठीही हा महत्त्वाचा दिवस आहे. रोजमेळ व हिशेबाच्या नव्या वह्यांची सुरुवात धनत्रयोदशीच्या वहीपूजनानेच केली जाते. यादिवशी कणकीचे दिवे दक्षिणामुखी करून ठेवले जातात. त्यास यमदीपदान असेही म्हटले जाते. तसेच धन्वंतरी जयंती म्हणून या दिवशी धन्वंतरीचे पूजन केले जाते. त्यामुळे विविधांगाने या दिवसाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे धनत्रयोदशीची पूर्वतयारी रविवारी बाजारात सुरू होती. नव्या वह्यांची खरेदीही केली जात होती. सांगलीच्या प्रमुख बाजारपेठांमधील व्यापारी त्याच्या तयारीत व्यस्त दिसत होते.दिवाळीसाठी आता सांगली सज्ज झाली आहे. आकाशकंदील, पणत्यांच्या प्रकाशात हा सण उजळणार असून, त्याची लगबगही रविवारी घरोघरी सुरू होती. दारोदारी सडा, रांगोळी, दिव्यांचा प्रकाश आणि फुलांच्या माळांनी पूजेला बहर येणार आहे. कितीही अडचणी आल्या तरीही, या मांगल्याच्या सणाचे स्वागत मनात उत्साह घेऊन करण्याची भारतीय परंपरा आहे. या परंपरेनुसार सर्वत्र तयारी झाली आहे.बाजारपेठांमध्ये रविवारी सायंकाळी गर्दी झाली होती. रेडिमेड गारमेंटसह रस्त्यावर अगरबत्तीपासून उटणे, लक्ष्मीपूजनाची पुस्तके, पणत्या, आकाशकंदील, फराळाचे पदार्थ अशा साहित्याचे स्टॉल्स सजले आहेत. खरेदी अंतिम टप्प्यात आली असली तरी, अजूनही विद्युत माळा, पणत्यांची खरेदी होतच आहे. शहरात मुख्य बाजारपेठांसह उपनगरांतही सुगंधी उटणे, साबण, सुगंधित तेल आदींचे स्टॉल उभारले असून, यालाही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. सांगली शहराबरोबर, मिरज, कुपवाड शहरातही बाजारात ग्राहकांची गर्दी आहे.