शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

सांगली ‘सीआयडी’च्या खांद्यावर चौकशांचा भार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 1:07 AM

येथील ‘सीआयडी’ विभागावर एकापाठोपाठ एक चौकशांचा भार टाकला जात असल्याने हा विभाग गेल्या काही दिवसात चर्चेत आला आहे. पोलीस कोठडीत

ठळक मुद्देकार्यालय चर्चेत : एकापाठोपाठ एक गंभीर गुन्ह्यांचा तपास सुपूर्द, सोयी-सुविधांच्या अभावाने यंत्रणा त्रस्त

सांगली : येथील ‘सीआयडी’ विभागावर एकापाठोपाठ एक चौकशांचा भार टाकला जात असल्याने हा विभाग गेल्या काही दिवसात चर्चेत आला आहे. पोलीस कोठडीत अनिकेत कोथळे खुनाचा तपास नुकताच पूर्ण करून सुटकेचा नि:श्वास सोडत असतानाच तासगावची मारामारी आणि गळवेवाडी (ता. आटपाडी) येथील बालिकेवरील अत्याचार व खून प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे.रिसाला रस्त्यावर पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ सांगलीचे सीआयडी कार्यालय आहे.

पोलीस उपअधीक्षक व कर्मचारी यांच्यासाठी काम करण्यास दोन स्वतंत्र खोल्या आहेत. मोजक्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्यांना नेहमी काम करावे लागते. दिमतीला एक मोडकीतोडकी गाडी आहे. प्रवेशद्वाराजवळ अजूनही ‘सीआयडी’चे कार्यालय म्हणून पत्र्याचा फलक आहे. कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. हे सीआयडीचे कार्यालय आहे, असे कोणीच म्हणणार नाही. अत्यंत गुंतागुंत, आव्हानात्मक व समाजात चर्चेत राहिलेली जिल्ह्यातील प्रकरणे त्यांच्याकडे तपासासाठी येत आहेत. सध्याचा कामाचा भार पाहिला तर, शासनाकडून त्यांना म्हणाव्या तशा सोयी-सुविधांची मदत मिळत नाही. आहे त्या परिस्थितीत ते गाडा ढकलण्याचे काम करीत आहेत.

एखाद्या गुन्ह्याचा वर्षानुवर्षे तपास करणारी ही यंत्रणा म्हणून अजूनही ‘सीआयडी’वर शिक्का आहे; पण तपासातील अनेक बारकाव्यांचा शोध घेऊन मुळापर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. बहुचर्चित १९९४ मधील शालेय पोषण आहाराचा तपास सीआयडीने केला होता. त्यावेळी हा विभाग चर्चेत होता; पण हा तपास पूर्ण झाल्यानंतर सीआयडी विभाग पडद्याआड गेला. त्यानंतर अपवाद वगळता कोणत्याही गंभीर गुन्ह्याचा तपास त्यांच्याकडे गेला नाही. त्यामुळे सायंकाळी पाच वाजले की कार्यालय बंद होत असे. रविवारीही कार्यालय बंद ठेवून अधिकारी व कर्मचारी सुटी घेत होते. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत अनिकेत कोथळेचा झालेल्या खुनाचा तपास आल्यानंतर ‘सीआयडी’ विभाग चांगलाच चर्चेत आला. तेव्हापासून सीआयडीच्या कार्यालयात गजबज सुरू झाली. परिसराची स्वच्छता झाली. पिण्याच्या पाण्याच्या नळाला पाणीही येऊ लागले. २४ तास कार्यालयास स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त लागला.गुन्ह्यांच्या फायलींचा ढीगअनिकेत कोथळे खून प्रकरणानंतर अनेक गंभीर गुन्ह्यांच्या चौकशीचा भार सीआयडीच्या खांद्यावर टाकण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी व त्यांची ‘टीम’ सातत्याने तपासातच गुरफटत राहत आहे. कधी-काळी तीन-चार वर्षातून एखादा तपास त्यांच्याकडे येत असे. पण गेल्या काही महिन्यात ही परिस्थिती बदलल्याने सांगलीचा सीआयडी विभाग सध्या ‘सुसाट’आहे. जत तालुक्यातील दोन गुन्ह्यांचा तपास प्रलंबित असतानाच वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील पोलिसांनी सव्वानऊ कोटींच्या रकमेवर मारलेल्या डल्ला प्रकरणाचा तपास काही मुद्द्यावर करण्याची जबाबदारी पडली होती. तोपर्यंत कोथळे प्रकरण घडले. गेल्या महिन्याभरात तर तासगाव मारामारी व गळवेवाडीतील बालिका अत्याचार व खुनाचा तपास आला आहे.सध्याचे सुरू असलेले तपाससंख (ता. जत) येथील पोलीस चौकीतील संशयिताचा मृत्यू.उमदी ठाण्यातील संशयिताची आत्महत्या.सांगली शहर पोलीस ठाण्यात कोठडीत अनिकेत कोथळेचा खून. तासगाव नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीवेळची मारामारी.गळवेवाडी (ता. आटपाडी) येथील बालिकेचा अत्याचार करून खून.वारणानगर (जि. कोल्हापूर) पोलिसांनी लंपास केलेली सव्वानऊ कोटींची रोकड.

टॅग्स :Crimeगुन्हाSangliसांगलीPoliceपोलिस