शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

सांगलीत काँग्रेस चार्ज, गटबाजीही रिचार्ज, अंतर्गत संघर्षाने खचले सैन्यबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:27 AM

पाचपैकी तीन राज्यांतील निवडणुकांत काँग्रेसने मिळविलेल्या यशानंतर सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते चार्ज झाले असले तरी, सोबतीला गटबाजीही तितक्याच उत्साहाने रिचार्ज होताना दिसत आहे. वाढती गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि नेतृत्वहीन झालेल्या सांगलीतील काँग्रेसच्या वाटचालीबद्दल प्रदेश कार्यकारिणीतही चिंता व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देसांगलीत काँग्रेस चार्ज, गटबाजीही रिचार्जअंतर्गत संघर्षाने खचले सैन्यबळ

अविनाश कोळी  

सांगली : पाचपैकी तीन राज्यांतील निवडणुकांत काँग्रेसने मिळविलेल्या यशानंतर सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते चार्ज झाले असले तरी, सोबतीला गटबाजीही तितक्याच उत्साहाने रिचार्ज होताना दिसत आहे. वाढती गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि नेतृत्वहीन झालेल्या सांगलीतील काँग्रेसच्या वाटचालीबद्दल प्रदेश कार्यकारिणीतही चिंता व्यक्त होत आहे.मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत सांगली काँग्रेसमधील समन्वयाचा अभाव, गोंधळ व गटबाजी स्पष्टपणे दिसून आली. पतंगराव कदम, मदन पाटील यांच्यासारखे खमके नेतृत्व आता नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक नेत्यांनी मान्य केले होते. समन्वयाची तात्पुरती जबाबदारी पृथ्वीराज चव्हाणांवर सोपविण्यात आली आहे. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या जिल्ह्यात भाजपने याच परिस्थितीचा फायदा घेत मुसंडी मारली आहे.खासदार तसेच सर्वाधिक चार आमदार असलेला भाजप आता ताकद विस्तारण्यात दंग आहे. दुसरीकडे भाजपला टक्कर देण्याची तयारी करण्यापेक्षा, काँग्रेसमध्ये कुरघोड्यांचे राजकारण रंगले. त्यामुळे गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जेवढी ताकद काँग्रेसकडे होती, त्यातील निम्मी ताकदही आता राहिलेली नाही.

सक्षम नेतृत्वाचा अभाव आणि गटबाजीला आलेले उधाण काँग्रेसची ताकद कमी करण्यास कारणीभूत ठरत आहेत. कार्यकर्त्यांच्या बाबतीत काँग्रेस अन्य पक्षांच्या तुलनेत मजबूत दिसत असला तरी, नेत्यांमधील गटबाजीमुळे त्यांचे सैन्य खचले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी काँगे्रसच्या वरिष्ठ नेत्यांना चिंता वाटत आहे.मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील यशानंतर काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते बुधवारी रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा करताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर आणि मनातही उत्साहाच्या लाटा दिसून आल्या. पण दुसरीकडे धुमसणारी गटबाजीही तितक्याच तीव्रतेने या लाटांवर स्वार होताना दिसून आली.

मदन पाटील, पतंगराव कदम यांच्या काळातही गटबाजी होती, मात्र सर्व गटांना ऐन निवडणुकीत पंखाखाली घेत ताकदीने लढत देण्याचे त्यांच्यात कसबही होते. आता तसा प्रयत्न करणारा किंवा तशी ताकद असलेला एकही नेता काँगे्रसकडे नाही. भाजपला टक्कर देताना काँग्रेसला आता स्वत:चे घर प्रथम दुरुस्त करावे लागणार आहे.ही दुरुस्ती करण्यासाठी पक्षाकडे वेळही कमी आहे. मुदतीत गटबाजी रोखण्यात यश आले नाही, तर मागील निवडणुकांपेक्षा मोठ्या संकटास पक्षाला सामना करावा लागेल.गटबाजी उजेडात, मार्ग सापडेनाआॅगस्टमध्ये काँग्रेसच्या सांगलीतील संघर्ष यात्रेत प्रदेशच्या दिग्गज नेत्यांसमोर गटबाजी दिसून आली. शहरात लावलेल्या फलकांवरही पक्षाचे नेते, पदाधिकारी गटबाजीमुळे विभागले गेले होते. यावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बोट ठेवले होते. त्यापूर्वीही विधानपरिषद निवडणूक, महापालिका निवडणूक यामध्येही गटबाजी दिसून आली. वरिष्ठ नेत्यांना या गोष्टी कळूनही, त्यांना मार्ग सापडत नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSangliसांगली