सांगली : महापालिका हद्दीत डेंग्यू, स्वाइन फ्लूचा प्रसार वाढत चालला आहे. कुपवाडच्या नगरसेवक दाम्पत्यालाही डेंग्यू झाला आहे. तरीही आरोग्य यंत्रणा सुस्त आहे, असा आरोप करीत सत्ताधारी व विरोधकांनी स्थायी समिती सभेत आरोग्य विभागाला धारेवर धरले.सांगलीच्या खणभागात स्वाइन प्लूने महिलेचा बळी गेला. अनेकांना डेंग्यूची लागण झाली आहे. खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल आहेत. साथीच्या आजाराने नागरिक हैराण असताना, महापालिकेची आरोग्य यंत्रणा झोपा काढते का? कुपवाडचे नगरसेवक शेडजी मोहिते, त्यांच्या पत्नी नगरसेविका सविता मोहिते यांनाही डेंग्यू झाला आहे.अनेक नगरसेवकही आजारी आहेत. नगरसेवकांनाही साथीचे आजार झाले तरी, आरोग्य विभाग दखल घेत नाही. मग सामान्यांची कोण दखल घेणार? असा सवाल विष्णू माने यांनी उपस्थित केला.यावर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी सभेत खुलासा केला. ते म्हणाले, महापालिका क्षेत्रातील ३०७ जणांना डेंग्यूसदृश लागण झाली होती; पण तपासणीत केवळ सातजणांनाच डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. दोनजणांचा मृत्यू झाला तरी, औषध फवारणीने साथ आटोक्यात असल्याचे सांगितले. यावर माने यांनी कवठेकर यांना धारेवर धरत आरोग्य अधिकाऱ्यांचा अहवाल बोगस असल्याचा आरोप केला.योगेंद्र थोरात म्हणाले, सव्वा कोटी रुपये खर्चून दरवर्षी औषध खरेदी होते. तेच ठेकेदार, तीच औषधे आणि खरेदी करणारी तीच साखळी. औषधे खरेदीचा दर्जा कधीच तपासला नाही. याचे स्वतंत्र आॅडिट व्हावे. एकूणच रुग्णालये, यंत्रणा आणि औषध खरेदीसाठी स्वतंत्र बैठक लावण्यात यावी. सभापती पाटील यांनी प्रशासनास त्यासंदर्भात तात्काळ नियोजन करण्याचे आदेश दिले.
सांगलीत नगरसेवक दाम्पत्याला डेंग्यू, महापालिका स्थायीत आरोग्य विभाग धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 2:56 PM
सांगली महापालिका हद्दीत डेंग्यू, स्वाइन फ्लूचा प्रसार वाढत चालला आहे. कुपवाडच्या नगरसेवक दाम्पत्यालाही डेंग्यू झाला आहे. तरीही आरोग्य यंत्रणा सुस्त आहे, असा आरोप करीत सत्ताधारी व विरोधकांनी स्थायी समिती सभेत आरोग्य विभागाला धारेवर धरले.
ठळक मुद्देसांगलीत नगरसेवक दाम्पत्याला डेंग्यू, महापालिका स्थायीत पडसाद समिती सभेत आरोग्य विभाग धारेवर