सांगली : सुधार समितीच्या रेट्यामुळे महापालिकेने महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधली; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ती कुलूपबंद अवस्थेत आहेत. ही कुलूपे काढून महिला स्वच्छतागृहे वापरासाठी खुली न केल्यास आयुक्त कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा सुधार समितीच्या अॅड. अरुणा शिंदे, तेजश्री अवघडे, शुभांगी रुईकर, मीना मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.पत्रकात म्हटले आहे की, गेली तीन वर्षे सांगली जिल्हा सुधार समिती व राइट टू पी मुंबई यांच्यावतीने आम्ही महिलांकरिता स्वच्छ व सुरक्षित स्वछतागृह बांधण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. पुरुष स्वच्छतागृहांचा प्रतिकात्मक ताबा घेणे, परिषद भरवणे, निवेदन व आंदोलने याबरोबरच महिला स्वच्छतागृहांचा आराखडासुद्धा आम्ही प्रशासनाला दिला. तसेच पाठपुरावा करत निधीसाठी तरतूद करायला भाग पाडले. वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर प्रशासनाने महापालिका क्षेत्रात महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधली. याकरिता राइट टू पी मुंबईने राज्य शासनाला दिलेल्या महिला स्वच्छतागृहांसाठीच्या अद्ययावत आराखडा स्वीकारला गेला. त्यानुसार महापालिका क्षेत्रामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्यास महापालिकेने सुरुवात केली. ती बांधून पूर्ण झाली तरीही अद्याप ती वापरासाठी खुली केली नाहीत. याबाबत पाठपुरावा करूनही प्रशासनाने त्या स्वच्छतागृहांना कुलूप लावून ठेवली आहेत व पाण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे या महिला स्वच्छतागृहांची कुलूपे काढून तेथे पाण्याची तसेच देखभाल व सुरक्षेची सोय करून ती वापरासाठी खुली न केल्यास आयुक्त कार्यलयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा दिला आहे. पत्रकावर प्रा. राणी यादव, अलका पाटील, ज्योती बारडोल, मधु गिड्डे, मुबीना पटेल, रेवती शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आयुक्त कार्यालयास टाळे ठोकणार- सांगली सुधार समितीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:21 AM
सांगली : सुधार समितीच्या रेट्यामुळे महापालिकेने महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधली; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ती कुलूपबंद अवस्थेत आहेत. ही कुलूपे काढून महिला स्वच्छतागृहे वापरासाठी खुली न केल्यास आयुक्त कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा सुधार समितीच्या अॅड. अरुणा शिंदे, तेजश्री अवघडे, शुभांगी रुईकर, मीना मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.पत्रकात म्हटले आहे की, ...
ठळक मुद्देमहिला स्वच्छतागृहे खुली करण्याची मागणी