शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

Sangli: बेवारस ट्रॅव्हल बॅगमध्ये सापडला कुजलेला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 8:50 PM

Sangli Crime News: शिराळा येथील बाह्य वळण रस्त्यावरील सुरले पाटील वस्ती जवळील पुलाखाली बेवारस ट्रॅव्हल बॅगेमध्ये ठेवलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.हा मृतदेह पुरुष की स्त्री याबाबत अद्याप समजू शकले नाही. ही घटना आज सोमवार दि.२० रोजी सकाळी ९:३० च्या दरम्यान समजली.

- विकास शहाशिराळा - शिराळा येथील बाह्य वळण रस्त्यावरील सुरले पाटील वस्ती जवळील पुलाखाली  बेवारस  ट्रॅव्हल बॅगेमध्ये ठेवलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.हा मृतदेह पुरुष की स्त्री याबाबत अद्याप समजू शकले नाही. ही घटना आज सोमवार दि.२० रोजी सकाळी ९:३० च्या दरम्यान समजली. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र समजल्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी शिराळा पोलिसांनी लगेच धाव घेतली.याठिकाणी श्वान पथक व ठसे तज्ञांना बोलवण्यात आले होते.हा खून पंधरा दिवसांपूर्वी झाला असल्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की , या परिसरात दुर्गंधी येत असल्याचे फोन वरून कळविण्यात त्यावरून पोलीस ठाण्यात कळविण्यात आले.यावेळी तातडीने पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम , सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता मेनकर यांच्यासह सुभाष पाटील, संदीप पाटील, सुनील पेटकर, नितीन यादव ,अमोल साठे, सुनील पाटोळे, महेश गायकवाड ,संदीप भानुसे, रजनी जाधव, अमर जाधव यांनी धाव घेतली. याठिकाणी पाहणी केली असता एका बॅगेमध्ये सतरंजीमध्ये गुंडाळलेला पूर्ण कुजलेल्या अवस्थेत गळ्याभोवती व शरीरास  नायलॉनच्या दोरीने बांधल्याचे  आढळून आले.

त्या मृतदेहाची कवटी , हाडे शिल्लक होती. याबाबत तातडीने श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. तसेच मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळी डॉ.जुबेर मोमीन , डॉ.अनिरुद्ध काकडे , डॉ योगिता माने शवविच्छेदन केले. कोल्हापूर परिक्षेत्र अधिकारी सुनील फुलारी , जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋतू खोखर , विभागीय पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.

श्वान त्याच ठिकाणी घुटमळला तसेच ठसे तज्ञांना काही संशयास्पद माहिती मिळाली नाही.पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यातून बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.मृतदेहाच्या अंगात पांढरा टी शर्ट , कंबरेला पंचरंगी दोरा आढळून आला.मृतदेहाचे काही अवशेष तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आले आहेत. या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अज्ञात व्यक्तीने अज्ञात व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध फिर्याद हवालदार सुनील पेटकर यांनी दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम हे करीत आहेत.

- दुपारी एक च्या दरम्यान याठिकाणी गर्दी का आहे हे चारचाकी गाडी चालक पहात गाडी चालवत होता.या चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणारी मोटारसायकल या गाडीस धडकून मोटारसायकल वरील मागे बसलेला युवक उडून चारचाकी गाडीच्या मागील काचेवर पडला यामध्ये या युवकाला डोके तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे.उपस्थित पोलिसांनी गाडी चालकास बोलावून घेतले तसेच जखमी युवकास तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.- दहा वर्षांपूर्वी याच रस्त्यावरील नाथ मंदिर जवळील पुलावरून बारा वर्षाच्या मुलाचा मृतदेह टाकला होता मात्र या घटनेचा त्वरित शोध लागून कवलापूर येथील या मुलाचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे उघडकीस आले होते.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी