शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

सांगली जिल्ह्यात १०३ गावांना अतिवृष्टी, महापुराचा दणका, वाळवा, शिराळा, पलूसमध्ये सर्वाधिक हानी; व्यापारी पेठेचे कंबरडे मोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 11:18 AM

Flood in Sangli 2021: प्रलयंकारी महापुराने सांगली जिल्ह्याच्या पाच तालुक्यांतील १६ हजार हेक्टरहून अधिक शेती उद्ध्वस्त केली आहे. वाळवा आणि शिराळा तालुक्यांत शेतातील माती वाहून जमिनीतील खडक उघडे पडले आहेत.

- संतोष भिसेसांगली : प्रलयंकारी महापुराने सांगली जिल्ह्याच्या पाच तालुक्यांतील १६ हजार हेक्टरहून अधिक शेती उद्ध्वस्त केली आहे. वाळवा आणि शिराळा तालुक्यांत शेतातील माती वाहून जमिनीतील खडक उघडे पडले आहेत. नदीकाठची मळीची दोन-पाच गुंठे शेेती वाहून गेल्याने अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. सांगलीच्या व्यापारी पेठेलाही मोठा दणका बसला आहे.२०१९ च्या हानीतून सावरण्यापूर्वीच यंदा पुन्हा महापूर आल्याने जिल्ह्याचे कंबरडे मोडले आहे. मिरज, वाळवा, शिराळा, पलूस व तासगाव तालुक्यांतील नदीकाठच्या १०३ गावांत कृष्णा-वारणेने थैमान घातले, तर त्याशिवाय दहा गावांत अतिवृष्टी झाली. कोयना व चांदोली धरणांतून सोडलेल्या पाण्याने हाहाकार उडवला. आतापर्यंत १६ हजार ८७९ कुटुंबांच्या नुकसानीची माहिती नोंदविण्यात आली आहे. शिराळा तालुक्यात मणदूर, भाष्टेवाडी, कोकणेवाडी, मिरुखेवाडी, विठ्ठलवाडी, देववाडी, ठाणापुडे, डफळेवाडी, बोरगेवाडी या गावांलगतचे डोंगर खचले असून तळीयेसारख्या दुर्घटनेचे सावट आहे. महापालिका क्षेत्र, तसेच ग्रामीण भागात ४५ हजार ३५२ कुटुंबांना पुराचा फटका बसला. २८७ घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाली. दीड हजार घरांची पडझड झाली आहे. पलूस व वाळवा तालुक्यांत पोल्ट्रीमध्ये पाणी शिरल्याने ५० हजार कोंबड्या मरण पावल्या. प्रशासनाने पंचनामे गतीने सुरू केले असले तरी मिळणारी मदत शेतकऱ्यांना पुन्हा उभा करण्यासाठी पुरेशी असणार नाही. नदीकाठी अनेक शेतकऱ्यांकडे पाच-दहा गुंठ्यांची शेती आहे. नदीच्या वेगवान प्रवाहाने ती खरडून काढली, त्यामुळे शेती वाहून गेली असून, हे शेतकरी कागदावरच शेतीचे मालक राहिले आहेत. वाळवा तालुक्यात सर्वाधिक ९८ गावांना, शिराळ्यात ९५, तर मिरज व पलूस तालुक्यांत प्रत्येकी २६ गावांना पुराचा फटका बसला. अतिवृष्टीने तासगावमध्येही दोन गावांत नुकसान झाले.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूर