सांगली : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी, दुपारी दहावीचा निकाल जाहीर झाला. सांगली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६.०८ टक्के इतका लागला आहे. एकूण ३७ हजार ७६६ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून यापैकी ३६ हजार २८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती. शुक्रवारी हा निकाल जाहीर करण्यात आला. ऑनलाइन पद्धतीने हा निकाल लागला. त्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. जिल्ह्यातून २० हजार ४६० मुलांनी आणि १७ हजार ४२९ मुलींनी दहावीची परीक्षा दिली होती. यापैकी १९ हजार २५५ मुले आणि १७ हजार ३३ मुली उत्तीर्ण झाले आहेत. मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ९४.६७ टक्के इतकी असून मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९७.७२ टक्के इतकी आहे.