Sangli District Bank Elections : महाविकास आघाडी जिंकली; पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 01:15 PM2021-11-24T13:15:42+5:302021-11-24T13:16:39+5:30

अविनाश कोळी सांगली : पायात पाय घालण्याच्या खेळ्या, समन्वयाचा अभाव, वर्चस्ववादाची लढाई यामुळे जिल्हा बँकेत महाविकास आघाडी सत्तेत येऊनही ...

Sangli District Bank Elections Mahavikas Aghadi wins | Sangli District Bank Elections : महाविकास आघाडी जिंकली; पण..

Sangli District Bank Elections : महाविकास आघाडी जिंकली; पण..

googlenewsNext

अविनाश कोळी
सांगली : पायात पाय घालण्याच्या खेळ्या, समन्वयाचा अभाव, वर्चस्ववादाची लढाई यामुळे जिल्हा बँकेत महाविकास आघाडी सत्तेत येऊनही संशयाच्या धुक्यामुळे बिघाडीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. दोन्ही काँग्रेसच्या भांडणात भाजपचा फायदा होऊन त्यांना ताकदीपेक्षा अधिक जागा मिळाल्या. त्यामुळे पुढील पाच वर्षांचा काळ आघाडीतील घटक पक्षांच्या कसोटीचा काळ राहणार आहे.

जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत काँग्रेसने स्वतंत्र पॅनेल उभे केले होते. मात्र काही काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीच्या पॅनेलला साथ दिली. त्यात भाजपचाही समावेश होता. राष्ट्रवादीने यंदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला; मात्र काँग्रेसने भाजपला सोबत घेण्यास विरोध केला. त्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येऊनही एकमेकांविरोधात छुप्या खेळ्या करण्यात आल्या. त्याचा फटका दोघांनाही बसला. काँग्रेसने सात जागा लढविल्या. मात्र दोन जागांवर त्यांना पराभूत व्हावे लागले. राष्ट्रवादीने ११ उमेदवार उभे केले; मात्र ९ जागांवरच त्यांना यश मिळाले.

भाजपला उमेदवार उभे करतानाही कसरत करावी लागली. तरीही त्यांनी चिकाटीने निवडणूक लढवत चारा जागा जिंकल्या. दोन्ही काँग्रेसच्या भांडणात त्यांचा फायदा झाला. जत सोसायटी गटातील निवडणूक आघाडीतील बिघाडीसाठी कळीचा मुद्दा ठरली. तेथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे मावसभाऊ, आमदार विक्रम सावंत पराभूत झाले. राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या प्रकाश जमदाडेंना भाजपने उमेदवारी दिली आणि त्यांच्या रूपाने भाजपला यश मिळाले. या निकालामुळे ‘करेक्ट कार्यक्रम’ पुन्हा चर्चेत आला. पतसंस्था गटात काँग्रेसचे केवळ पृथ्वीराज पाटील निवडून आले, मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने राष्ट्रवादीकडूनही संशय व्यक्त होत आहे.

शिवसेनेचे बळ वाढले

मागील संचालक मंडळात केवळ आमदार अनिल बाबर यांच्या माध्यमातून शिवसेनेचा एकच संचालक होता. यंदा तीन जागा मिळवून शिवसेनेने बँकेतील बळ वाढविले. जागावाटपात त्यांनी धरलेला हट्ट व तडजोड कामी आली.

मदनभाऊ गटाचे पुन्हा अस्तित्व

मागील निवडणुकीत दिवंगत काँग्रेस नेते मदन पाटील यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे बँकेत मदनभाऊ गटाचे अस्तित्व नव्हते. जयश्रीताई पाटील यांच्या विजयाने या गटाचे बँकेत पुन्हा एकदा अस्तित्व निर्माण झाले आहे. विजयानंतर ‘कहो दिल से, मदनभाऊ फिर से’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

गटनिहाय निकाल असा (कंसात मते)

गट विजयी पराभूत

आटपाडी अ तानाजी पाटील (४०) राजेंद्रअण्णा देशमुख (२९)

क. महांकाळ अ अजितराव घोरपडे (५४) विठ्ठल पाटील (१४)

खानापूर अ आ. अनिल बाबर (बिनविरोध)

जत अ प्रकाश जमदाडे (४५) आ. विक्रम सावंत (४०)

तासगाव अ बी. एस. पाटील (४१) सुनील जाधव (२३)

मिरज अ विशाल पाटील (४१) उमेश पाटील (१६)

वाळवा अ दिलीपराव पाटील (१०८) भानुदास मोटे (२३)

शिराळा अ आ. मानसिंगराव नाईक (बिनविरोध)

पलूस अ महेंद्र लाड (बिनविरोध)

कडेगाव अ आ. मोहनराव कदम (५३) तुकाराम शिंदे (११)

महिला जयश्रीताई पाटील (१६८६) संगीता खोत (६१६)

अनिता सगरे (१४०८) दीपाली पाटील (४३९)

अनु. जाती बाळासाहेब होनमोरे (१५०३), रमेश साबळे (५४८)

ओबीसी मन्सूर खतीब (१३७५) तम्मनगौडा रवीपाटील (७६९)

भटक्या व विमुक्त जाती चिमण डांगे (१६७४) परशुराम नागरगोजे (४६६)

इतर शेती संस्था वैभव शिंदे (३०२) तानाजीराव पाटील (८)

प्रक्रिया संस्था सुरेश पाटील (४३) सी. बी. पाटील (२९)

पतसंस्था पृथ्वीराज पाटील (४१८) किरण लाड (३३५)

राहुल महाडिक (३९२) अजित चव्हाण (८२)

मजूर सोसायटी सत्यजित देशमुख (२७४) सुनील ताटे (११७)

संग्रामसिंह देशमुख (२६१) हणमंतराव देशमुख (९९).

Web Title: Sangli District Bank Elections Mahavikas Aghadi wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.