शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सांगली जिल्हा बँक राज्यात अव्वल, ढोबळ नफा ७३ कोटींचा : गतवर्षाच्या तुलनेत ४१ टक्क्यांनी नफावृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 4:00 PM

अडचणींचे अनेक बांध तोडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने २0१७-१८ या आर्थिक वर्षात ७२ कोटी ८१ लाख ३३ हजार रुपयांचा ढोबळ नफा मिळवित राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. तुलनात्मकदृष्ट्या या आर्थिक वर्षात ४0.९७ टक्क्यांनी नफावृद्धी झाली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसांगली जिल्हा बँक राज्यात अव्वल, ढोबळ नफा ७३ कोटींचा गतवर्षाच्या तुलनेत ४१ टक्क्यांनी नफावृद्धी

सांगली : अडचणींचे अनेक बांध तोडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने २0१७-१८ या आर्थिक वर्षात ७२ कोटी ८१ लाख ३३ हजार रुपयांचा ढोबळ नफा मिळवित राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. तुलनात्मकदृष्ट्या या आर्थिक वर्षात ४0.९७ टक्क्यांनी नफावृद्धी झाली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, शिल्लक नोटा, कर्जमाफी यासह अनेक कारणांनी सांगली जिल्हा बँकेसमोरील अडचणींमध्ये वाढ झाली होती. तरीही योग्य नियोजन आणि चिकाटीने काम करून बँकेने यंदा राज्यात विक्रमी नफा कमाविला आहे. नोटाबंदीनंतर बँकेकडे आठ महिने पडून असलेल्या ३१५ कोटींच्या शिल्लक जुन्या नोटांवरील व्याजाचे नुकसान २१ कोटी ६३ लाख रुपये इतके आहे.

सध्या शिल्लक असलेल्या १४ कोटीच्या जुन्या नोटांवरील व्याजाचा १ कोटी १४ लाखाचा आणि पीक कर्जवाटपात झालेला २१ कोटींच्या तोट्याचा विचार करता यंदा ११६ कोटी ५८ लाख रुपये खर्चापेक्षाचे जादा उत्पन्न ठरले असते. त्यामुळे प्रत्यक्ष नसली तरी शंभर कोटीची उद्दीष्टपूर्ती झाल्याचे चित्र आहे.व्यवहारात झालेल्या वाढीमुळे ढोबळ एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेटस्)चे प्रमाण १३.१0 टक्क्यांवरून आता ११.६0 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. ढोबळ नफ्यातून आता कोणकोणत्या तरतुदी करायच्या याबाबतचा निर्णय संचालक मंडळ घेणार आहे. त्यानंतर निव्वळ नफा स्पष्ट होईल.

राज्यातील सक्षम जिल्हा मध्यवर्ती बँकांचा विचार केला तर त्यांचा ढोबळ नफा हा ५५ कोटींच्या घरात आहे. त्यामुळे त्यांचा निव्वळ नफा २५ कोटींच्या घरात जाऊ शकतो, तर जिल्हा बँकेचा निव्वळ नफा हा त्यांच्यापेक्षा जास्त असेल त्यामुळे ढोबळ आणि निव्वळ नफ्याच्या पातळीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक राज्यात अव्वलच ठरणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, संचालक विलासराव शिंदे, श्रद्धा चरापले, कमल पाटील, विक्रम सावंत, उदयसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हा, सरव्यवस्थापक बी. एम. रामदुर्ग, मानसिंग पाटील उपस्थित होते.शेतीकर्जाची वसुली घटलीकर्जमाफी योजनेत वेळोवेळी झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढत गेल्या. त्यामुळे संपलेल्या आर्थिक वर्षात तुलनेने शेती कर्जाची वसुली ९ टक्के कमी झाली आहे. पीक कर्जवाटपही १२१ कोटींनी कमी झाले आहे, अश्ी माहिती पाटील यांनी दिली.नोकरभरती लवकरच !सांगली जिल्हा बँकेचा कर्मचारी आकृतीबंध हा १ हजार ४४२ चा आहे. सध्या ९८७ कर्मचारी कार्यरत आहेत. अद्याप ४६५ जागा रिक्त असून भरती प्रक्रियेला मंजुरी मिळाली असून लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल.

राज्यातील काही जिल्हा बँकांमधील नोकरभरती अपारदर्शीपणाच्या संशयाने अडचणीत आली आहे. त्यामुळे आम्ही अधिक सावध आहोत. भरती टाळण्याऐवजी ती अधिक पारदर्शीपणाने करण्यावर आमचा भर राहिल, असे दिलीपतात्या पाटील म्हणाले. 

टॅग्स :bankबँकSangliसांगली