शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
2
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
3
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
4
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
5
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
6
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
7
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
8
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
9
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
10
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
11
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
12
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
13
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
14
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
15
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
16
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
17
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
18
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
19
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
20
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ

राज्यात पहिल्या पाचमध्ये सांगली जिल्हा बँकेचा समावेश, अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 12:54 PM

शेती पूरक व्यवसायाला १११ कोटींचे कर्ज वाटप

सांगली : जिल्हा बँकेने शेती पूरक व्यवसायाला १११ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. जिल्हा बँकेने प्रगती करीत आठ हजार कोटी ठेवी करीत १५ हजार कोटींची उलाढाल केली आहे. शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत शून्य टक्के दराने कर्ज, शेतकरी विमा, शेतीच्या थकीत कर्जांसाठी ओटीएस योजना स्वीकारली आहे. या योजना राज्यातील अन्य बँकांनी स्वीकारल्या आहेत. त्यामुळे राज्यातील पहिल्या पाच बँकांमध्ये सांगली जिल्हा बँकांचा समावेश आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली.मानसिंगराव नाईक म्हणाले, पावणेतीन वर्षांपूर्वी अध्यक्षपद घेतल्यापासून शेतकरी, विकास संस्था, अन्य सहकारी संस्था केंद्रबिंदू मानून काम केले आहे. शेतकऱ्यांना सक्षम करून कृषी व ग्रामीण विकास करणे हे उद्दिष्ट आहे. ३१ मार्च २०२४ रोजी जिल्हा बँकेने सात हजार ९०५ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला आहे. सहा हजार ६९६ कोटी कर्जे असून, व्यवसाय १५ हजार कोटींवर पोहोचला आहे.गतवर्षी २०४ कोटी रुपयांचा नफा मिळाला. शासनाने पीक कर्जाचे एक हजार ६९० कोटीचे टार्गेट दिले होते. मात्र, बँकेने एक हजार ८०७ कोटींचा कर्जपुरवठा केला असून, एक हजार ४९६ कोटी येणे बाकी आहे. केंद्र सरकारने व्याज परतावा रकमेत कपात केली. तरीही बँकेने उर्वरित अर्धा टक्का तोटा सहन करून शेतकऱ्यांना मदत केली. दुष्काळी परिस्थिती, अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकरी वेळेवर कर्ज परतफेड करू शकत नाहीत.शेतकरी, बिगर शेतीसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना (ओटीएस) राबवली. बँकेने नऊ हजार ७८४ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला आहे. या शेतकऱ्यांना बँकेच्या नफ्यातून ३१.८१ कोटींची सवलत दिली आहे. सभासदांच्या कुटुंबातल्या मुलीच्या लग्नकार्यासाठी तातडीचे ५० हजाराचे कर्ज, शेतकरी कर्जदार मुलीच्या लग्नास १० हजार रुपये भेट देणार आहे. राज्यातील अन्य बँकांनी सांगली जिल्हा बँकेचा पॅटर्न राबवित आहेत.

ई-बँकिंगच्या सुविधा देणारशेतकऱ्यांना अत्यल्प व्याजदराने कर्जपुरवठा उपलब्ध होणाऱ्या केंद्र, राज्य शासन व नाबार्डच्या योजना राबविल्या जातात. जिल्हा बँकेने व्यवसाय वाढीसाठी भविष्यात मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, यूपीआय यांसारख्या ई-बँकिंगच्या सेवा-सुविधा देणार आहे. नवीन शाखा उघडणे, शाखांचे नूतनीकरण करून बँकेस कार्पोरेट लूक देणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीbankबँकMansingrao Naikमानसिंगराव नाईक