सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर २९.२८ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४0 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात सरासरी १८. ७ मि.मी. इतका पाऊस झाला आहे.
कालपासून आज सकाळपर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज २५. ७, जत ४.६, खानापूर-विटा १२, वाळवा-इस्लामपूर २0.६, तासगाव ११.५, शिराळा ५९, कवठेमहांकाळ ६.६, पलूस २१.४ आणि कडेगाव तालुक्यात २५. ४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये ७६.०८ टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता १०५.२५ टी.एम.सी, धोम धरणात ७.६३ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता १३.५० टी.एम.सी, कन्हेर धरणात ६.९९ टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता १०.१० टी.एम.सी. आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात १९.८५ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता २५.४० व राधानगरी धरणात ७.४१ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता ३६ टी.एम.सी. आहे. अलमट्टी धरणात १०७.७२ टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता १२ टी.एम.सी. आहे.सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून पाण्याचा एकूण १३ हजार ८८५ क्युसेक्स तर कोयना धरणातून कालवा व विद्युतगृहाव्दारे २ हजार १०० क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड १९.१० (४५), आयर्विन पूल सांगली २३ (४०) व अंकली पूल हरिपूर २४ (४५.११).