सचिन लाड ।सांगली : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी सलग ९६ तास रस्त्यावर आहेत ‘थर्टी फर्स्टला’ आख्खी रात्र त्यांनी जागून काढली. १ जानेवारीला थोडी विश्रांती मिळाली, तोपर्यंत २ जानेवारीला कोरेगाव-भीमा प्रकरण घडले अन् पुन्हा पोलिसांना डोळ्यात तेल घालून बंदोबस्त करावा लागला. अधिकाºयांचे चांगले पाठबळ मिळाल्याने कर्मचाºयांनी किरकोळ अपवाद वगळता कुठेही अनुचित प्रकार घडू दिला नाही.
अनिकेत कोथळे प्रकरणात जिल्हा पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली. पोलिस कुठेही रस्त्यावर दिसत नव्हते. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पण हेच पोलिस कोरेगाव-भीमा प्रकरणाचे जिल्ह्यात पडसाद उमटताच आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले. विशेषत: बुधवारी जिल्हा ‘बंद’वेळी सांगलीत निर्माण झालेल्या परिस्थितीवेळी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली नसती, तर मोठी दंगल झाली असती. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे स्वत: रस्त्यावर उतरले. बोराटे यांनी गणपती पेठेत जमावाला शांत करण्याची मोलाची भूमिका बजावली. तेथून सांगलीत वाढलेल्या दंग्याला पूर्णविराम मिळाला.
सांगलीत आजपर्यंत दंगलसदृश परिस्थिती निर्माण होईल, अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. प्रत्येक घटना दोन- चार दिवसभर धुमसत राहिल्या. मात्र बुधवारी केवळ पोलिसांनी डोळ्यात तेल घालून केलेल्या बंदोबस्तामुळे प्रकरण शांत झाले.‘थर्टी फर्स्ट’ला कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रात्री आठ वाजता संपूर्ण जिल्ह्यातील पोलिस रस्त्यावर उतरले. ऐन थंडीत पहाटेपर्यंत त्यांना बंदोबस्त करावा लागला. नवीन वर्षाचे स्वागत त्यांनी रस्त्यावरच केले. १ जानेवारीला त्यांना थोडीफार उसंत मिळाली. तोपर्यंत २ जानेवारीला कोरेगाव-भीमा प्रकरण घडले. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या भीतीने पोलिसांनी सोमवारी रात्रीपासूनच बंदोबस्ताचे नियोजन केले.सांगली, मिरजेत आंदोलनावेळी झालेली दगडफेक व बुधवारी बंदची हाक दिल्याने रात्रभर पोलिसांना बंदोबस्त करावा लागला. बुधवारी बंदला हिंसक वळण लागल्याने पोलिसांना प्यायला पाणीही मिळाले नाही.अजूनही बंदोबस्त कायमसांगली, मिरजेसह जिल्ह्यातील संवेदनशील भागात अजूनही पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. शहरातील प्रमुख चौकात शस्त्रधारी पोलिस तैनात आहेत. वरिष्ठ अधिकारी गस्त घालत आहेत. साध्या वेशात पोलिस फिरत आहेत. गुप्तवार्ता विभागाचे पोलिस गोपनीय माहिती काढून परिस्थितीचा अंदाज घेत आहेत.
पोलिस यंत्रणेने चांगल्याप्रकारे कायदा व सुव्यवस्था हाताळली. डोळ्यात तेल घालून बंदोबस्त केला. जिल्हा पोलिसप्रमुख व अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुखांनी अहोरात्र प्रयत्न करुन परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. कर्मचाºयांनी त्यांना चांगली साथ दिली.- विजय काळम-पाटील, जिल्हाधिकारीजनतेच्या संरक्षणासाठी पोलिस आहेत. कोठेही अनुचित प्रकार होऊ देणार नाही. दोन-चार लोकांमुळे परिस्थिती चिघळत असेल, तर कोणालाही सोडणार नाही. पोलिस दलातील प्रत्येकाने काम केल्याने बुधवारची परिस्थिती हाताळण्यात यश आले.- सुहेल शर्मा,जिल्हा पोलिसप्रमुखकायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, हे आमचे दररोजचे काम आहे. सर्वांनीच चांगले काम केल्याने जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले. प्रसारमाध्यमांनीही चांगली मदत केली. यापुढेही पोलिस काम करीतच राहतील.- शशिकांत बोराटे,अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख