सांगली : राज्य शासन पुरस्कृत मोदी आवास योजनेत सांगली जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. जिल्हाभरात १९५८ लाभार्थ्यांच्या घरांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे ही माहिती देण्यात आली. ग्रामीण भागात ही योजना राबविण्यासाठी २०२३-२४ या वर्षांत १९५८ लाभार्थी इतके उद्दिष्ट जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. यामध्ये १९०३ इतके लाभार्थी इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) व ५५ लाभार्थी विशेष मागास प्रवर्गातून पूर्ण करायचे होते. ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत यासाठी सर्व तालुक्यांतून प्रस्तावांची पूर्तता करुन घेण्यात आली. त्यांना मंजुरी देऊन १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. या लाभार्थ्यांनी घरांची बांधकामे लवकरात लवकर सुरु करावीत असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.तालुकानिहाय घरांना मंजुरी मिळालेल लाभार्थी असे : आटपाडी १६२, जत ५२०, कडेगाव ११४, कवठेमहांकाळ १५५, खानापूर ७१, मिरज २४९, पलूस १५०, शिराळा ९३, तासगाव १८९, वाळवा २५५. एकूण १९५८
मोदी आवास योजनेत राज्यात सांगली जिल्हा पहिल्या क्रमांकावर, किती प्रस्तावांना दिली मंजुरी.. जाणून घ्या
By संतोष भिसे | Published: January 18, 2024 4:43 PM