सांगली : तीन वर्षात जिल्ह्यातील वीज गळती साडेसहा टक्क्याने कमी झाली आहे. सांगली शहर विभागाची वीज गळती मात्र १.६ टक्क्याने वाढली आहे. उर्वरित चारही विभागातील वीज गळती कमी झाल्याचे महावितरणच्या आकडेवारीवरुन दिसत आहे. प्रत्यक्षात वीज गळती कमी होत असतानाही ग्राहकांवरील इंधन अधिभार मात्र वाढतच आहे.
महावितरणकडून दरवर्षी वीज गळती आणि चोरीचा आढावा घेण्यात येतो. जिल्ह्यात मूलभूत सुविधांसाठी पुरेसा निधी मिळाला नाही. जिल्ह्यात विद्युत बिलाची वसुली राज्यात सर्वाधिक असतानाही निधी मात्र तुटपुंजा मिळतो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीपंपाची विद्युत कनेक्शन्स प्रलंबित आहेत.
महावितरण अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार इस्लामपूर विभागाची २०१५-१६ या वर्षात १६.८६ टक्के गळती होती. यामध्ये दोन वर्षात २.४ टक्क्याने घट होऊन २०१७-१८ मध्ये १४.४६ टक्के झाली आहे. कवठेमहांकाळ विभागाची २०१५-१६ मध्ये सर्वाधिक ३७.१८ टक्के वीज गळती होती.यामध्ये २०१७-१८ वर्षात १३.०१ टक्क्याने कपात होऊन २०१७-१८ वर्षात २४.१७ टक्के झाली आहे. सांगली ग्रामीण आणि विटा विभागाचीही वीज गळती कमी झाली आहे.
सांगली शहरची २०१५-१६ वर्षात ५.१४ टक्के वीज गळती होती. ती ४.१२ टक्केपर्यंत आली. मात्र २०१७-१८ या वर्षात मात्र १.६४ टक्क्याने वीज गळती वाढली असून, सध्या ती ५.७६ टक्क्यावर गेली आहे. वीज गळतीच्या प्रश्नाकडे महावितरणच्या अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील तीन वर्षामधील वीज गळतीचे प्रमाणविभाग २०१५-१६ २०१६-१७ २०१७-१८इस्लामपूर १६.८६ टक्के १४.९५ टक्के १४.४६ टक्केकवठेमहांकाळ ३७.१८ २५.४४ २४.१७सांगली ग्रामीण २२.६८ १९.८७ १८.२८सांगली शहर ५.१४ ४.१२ ५.७६विटा २५.६५ १९.५४ १५.३४सांगली जिल्हा २२.२० १७.३८ १५.८०