शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सांगली जिल्ह्याला १०० ई-शिवाई बसेस मिळणार; पुणे, कोल्हापूर मार्गावर धावणार

By अशोक डोंबाळे | Published: October 04, 2023 6:35 PM

सांगली : जिल्ह्यातील इस्लामपूर, सांगली आणि मिरज आगाराला पहिल्या टप्प्यामध्ये खासगी कंपनीकडून १०० ई-शिवाई बसेस मिळणार आहेत. या बसेस ...

सांगली : जिल्ह्यातील इस्लामपूर, सांगली आणि मिरज आगाराला पहिल्या टप्प्यामध्ये खासगी कंपनीकडून १०० ई-शिवाई बसेस मिळणार आहेत. या बसेस पुणे, कोल्हापूर मार्गावर धावणार आहेत. या इलेक्ट्रिक बसेससाठी माधवनगर, इस्लामपूर आणि मिरज येथे चार्जिंग स्टेशन उभा करण्यात येणार असून, त्यासाठीची निविदाही निघाली आहे. येत्या तीन महिन्यांत चार्जिंग स्टेशनचे काम ठेकेदाराला पूर्ण करावे लागणार आहे.एस.टी. महामंडळाने एस.टी.चे सध्या ५० टक्के खासगीकरण केले आहे. त्यातूनच सध्या खासगी कंपन्यांकडून बसेस घेण्यासाठी एस.टी. महामंडळाचे धोरण आहे. इलेक्ट्रिक ई-बसेसही खासगी कंपनीकडून एस.टी. महामंडळाने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सांगली, मिरज आणि इस्लामपूर आगाराला पहिल्या टप्प्यामध्ये ई-शिवाई बसेस मिळणार आहेत. येत्या सहा महिन्यांत बसेस येणार आहेत. त्यादृष्टीने मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एस.टी. महामंडळाकडून प्रयत्न चालू आहेत.माधवनगर (ता. मिरज) येथील एस.टी. महामंडळाच्या मोकळ्या दहा एकर जागेत इलेक्ट्रिक बसेसचे चार्जिंग स्टेशन करण्यात येणार आहे. यासाठीची ४३ लाख २४ हजार ७४० रुपयांची निविदाही एस.टी. महामंडळाने काढली आहे. मिरज येथेही चार्जिंग स्टेशन होणार असून, त्यासाठी २७ लाख २३ हजार ८३४ रुपयांचा निधी मंजूर आहे. येथील कामाचीही निविदा प्रसिद्ध झाली असून, ठेकेदाराला तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

बसेस सहा महिन्यांत धावेल : सुनील भोकरेई-शिवाई बसेस इस्लामपूर, सांगली आणि मिरज आगाराला १०० मिळणार आहेत. या बसेस कोणत्या मार्गावर सोडायच्या आहेत, याचेही पूर्ण नियोजन झाले आहे. ई-शिवाई बसेसच्या चार्जिंगसाठी माधवनगर, मिरज येथे चार्जिंग स्टेशनच्या कामाची निविदाही प्रसिद्ध झाली आहे. तीन महिन्यांत काम पूर्ण होणार असून, येत्या सहा महिन्यांत जिल्ह्यात ई-शिवाई बसेस धावणार आहेत, अशी माहिती एस.टी. महामंडळाच्या सांगली विभागाचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगली