सांगली : काँग्रेस, जनता पक्ष, राष्टÑवादी, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा अनेक मोठ्या पक्ष, संघटनांचे प्रदेशाध्यक्षपद भूषविण्याची संधी सांगली जिल्ह्याला मिळाली. आजही अनेक पक्षांची महत्त्वाची पदे सांगली जिल्ह्याकडे आहेत. त्यामुळे पक्षीय नेतृत्व करणाऱ्यांची खाण म्हणून सांगली जिल्ह्याची ओळख आजही अबाधित आहे.जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी आजवर विविध पक्षांचे राज्याचे नेतृत्व केले. केंद्रीय कार्यकारिणीतही अनेक नेत्यांची वर्णी लागली. जवळपास ११ वेळा सांगली जिल्ह्याला प्रदेशाध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली. प्रदेश उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस यासारख्या पदांवरही येथील नेत्यांनी काम केले. प्रदीर्घ काळ मंत्रिमंडळातही जिल्ह्याने प्रभाव टाकला. राज्यात सत्ता कोणाचीही असली तरी, जिल्ह्याला मंत्रिपदे मिळत राहिली. येथील राजकारण्यांच्या नेतृत्वक्षमतेवर नेहमीच विश्वास व्यक्त करण्यात आला. महामंडळे, राज्यातील विविध सहकारी, शासकीय संस्था यामध्ये जिल्ह्यातील नेत्यांचे कार्य ठळकपणे नोंदले गेले. कधीकाळी जिल्ह्याला एकाचवेळी सहा-सात लाल दिव्यांच्या गाड्याही लाभल्या होत्या. केंद्रीय मंत्रिपदापर्यंतही जिल्ह्यातील नेत्यांनी मजल मारली. राजकीय क्षेत्रात अनेक महत्त्वाची पदे प्राप्त करून जिल्ह्याचे नाव या मंडळींनी नेहमी चर्चेत ठेवले.जिल्ह्यातील या नेत्यांनी भूषविले प्रदेशाध्यक्षपद...नाव पक्ष कार्यकाळराजारामबापू पाटील काँग्रेस १९५९वसंतदादा पाटील काँग्रेस १९७२राजारामबापू पाटील जनता पक्ष १९७७-८0राजारामबापू पाटील जनता पक्ष १९८0-८३गुलाबराव पाटील काँग्रेस १९८0-८२शिवाजीराव देशमुख काँग्रेस १९९२-९६संभाजी पवार जनता दल १९९३-१९९६आर. आर. पाटील राष्टÑवादी २00४ व २00८-0९प्रा. शरद पाटील जनता दल २00५ ते आजअखेरपतंगराव कदम काँग्रेस २00८ (प्रभारी)सदाभाऊ खोत स्वा. शे. सं. २00९-१५
राज्याच्या राजकारणामध्ये सांगली जिल्ह्याचा दबदबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:04 AM