सांगली : येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी बॉक्सिंगमध्ये सांगलीच्या, तर कुस्तीमध्ये साताऱ्याच्या खेळांडूनी वर्चस्व निर्माण केले. दरम्यान, उद्या दुपारी या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. बॉक्सिंगमध्ये ४९ किलो गटात सांगलीच्या रामचंद्र गायकवाड यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्याचबरोबर ७५ ते ८१ किलो गटात श्रीकांत फुके, ९१ किलोच्या वरील गटात सुनील जाधव या सांगलीच्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकाविला. ४९ ते ५२ किलो गटात अमित गोळे, ५२ ते ५६ किलोमध्ये प्रसाद जाधव व ५६ ते ६० किलो गटात संग्राम भुताळे या साताऱ्याच्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला.कुस्तीमध्ये साताऱ्याच्या खेळाडंूनी यश मिळविले. ५७ ते ६१ किलो गटात चेतन वाघमोडे, ६५ ते ७० किलो गटात जेटाप्पा लोणार या साताऱ्याच्या खेळाडूंनी अज्ािंक्यपद पटकावले. १२५ किलोवरील खुल्या वजन गटात सयाजी पाटील, रवींद्र पाटील, सचिन जामदाडे या तीनही सांगलीच्या खेळाडूंनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. इतर स्पर्धेतील प्रथम क्रमांक, कंसात विभाग असे : उंच उडी संतोष माळी (सांगली), महिला- उंच उडी सुनीता पाटील (सांगली), ४०० मीटर धावणे- अनिल ऐनापुरे (सांगली), दीड हजार मीटर धावणे महिला- मीनाताई देसाई (कोल्हापूर), पुरुष अमोल गिरी (सातारा), भालाफेक - अजित गुरव (कोल्हापूर), भालाफेक महिला- स्वप्निल पवार (पुणे ग्रामीण).४कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन उद्या (गुरुवार) दुपारी तीन वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु एन. जे. पवार यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार उपस्थित राहणार आहेत.
बॉक्सिंगमध्ये सांगलीचे वर्चस्व
By admin | Published: January 07, 2015 11:41 PM