शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

सांगली- आरक्षणांच्या बाजारामुळे महासभेत गोंधळ, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये झाला वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 3:12 PM

आरक्षण उठविण्याचा बाजार गेल्या काही दिवसांपासून मांडला गेल्याने याचे पडसाद मंगळवारी महापालिकेच्या सभेत उमटले.

सांगली : आरक्षण उठविण्याचा बाजार गेल्या काही दिवसांपासून मांडला गेल्याने याचे पडसाद मंगळवारी महापालिकेच्या सभेत उमटले. सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी राष्ट्रवादी सदस्य यांच्यात वादावादी झाल्यानंतर मंजुरीच्या घोषणाबाजीत महासभा गुंडाळण्यात आली. 

महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी महापौर हारुण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरुवातीलाच मागील १९ जानेवारी २0१८ च्या सभेचे इतिवृत्त मंजूर करण्याचा विषय घेण्यात आला. त्यावेळी महापौरांनी विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपांचा दाखला देत इतिवृत्ताचे सविस्तर वाचन करण्यास सांगितले. आरक्षणांच्या संदर्भात ज्या नगरसेवकांनी उपसूचना दिल्या आहेत त्यांची इतिवृत्तातील नावेही जाहीर करण्याची सूचना महापौरांनी केली. त्यामुळे उपसूचना दिलेल्या सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांनी याची गरज नसल्याचे मत मांडले. दुसरीकडे विरोधी राष्टÑवादी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत आरक्षण उठविण्याचे ठराव घुसडण्यात आल्याचा आरोप महापौरांवर केला. त्यामुळे महापौरही संतापले. नावांचे वाचन झाल्यावर नेमके हे उद्योग कोणी केले हे कळेल, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादी सदस्यांना दम भरला. राष्ट्रवादी सदस्य व माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी इतिवृत्तातील सर्वच ठराव प्रलंबित ठेवण्याची मागणी यावेळी केली. त्याचवेळी सत्ताधारी गटातील सदस्य उभे राहिले. दोन्ही गटातील सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत एकमेकांची उणी-दुणी काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतप्त महापौरांनी सभा गुंडाळली. मंजुरीच्या घोषणा सदस्यांनी दिल्या. महासभेनंतर पत्रकारांशी बोलताना महापौर शिकलगार म्हणाले की, आरक्षणासंदर्भात नगरसेवकांनी उपसूचना दिल्या असल्या तरी त्या आंधळेपणाने आम्ही मान्य करणार नाही. प्रशासन संबंधित उपसुचनांची दखल घेऊन प्रत्यक्ष जागांची पाहणी करेल आणि याविषयीची टिपणी देणार आहे. ज्याठिकाणचे आरक्षण घरांना बाधा करीत असेल त्याच आरक्षणांबाबत फेरबदल होतील, अन्यथा कोणतीही आरक्षणे रद्द अथवा बदलली जाणार नाही, असे स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते म्हणाले की, महापौरांनी महासभेतून पळ काढून आमच्या संशयाला बळ दिले आहे. आजही आम्ही आरक्षण उठविण्याच्या विरोधातच आहोत. आमच्यातील काही सदस्यांनी जर आरक्षण उठविण्याबाबत उपसूचना दिल्या असतील तर त्यांना आम्ही त्याबाबत स्पष्टपणे नकार दाखवू. घरे आरक्षणाने बाधित होत असतील तरच त्याठिकाणच्या आरक्षणाबाबत महापौर व प्रशासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा कोणत्याही आरक्षण बदलाच्या उपसूचनेची दखल घेऊ नये, अशी मागणी यावेळी केली.  

हे तर दोन्ही कॉंग्रेसचे नाटक- मानेमहापालिकेतील गोंधळ हा दोन्ही कॉंग्रेसकडून केलेले नाटक आहे. आरक्षणाचा विषय वादात सापडणार असल्याने दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी चर्चा करून सभा गुंडाळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच त्यांनी ही सभा मॅनेज केली होती, अशी टीका उपमहापौर गटाचे नेते शेखर माने यांनी केली. आम्ही यापुढेही बेकायदेशीर गोष्टींना थारा देणार नाही. मंगळवारी झालेल्या सभेतील एकाही ठरावाची अंमलबजावणी करण्यात येऊ नये, अशी मागणी आम्ही विभागीय आयुक्तांकडे करण

घाबरणारी औलाद नाही!महापौरांनी विषयांचे रितसर वाचन करण्याची सूचना नगरसचिवांना दिल्यानंतर सत्ताधारी गटनेते किशोर जामदार यांनी इतके तुम्ही का घाबरत आहात, असा सवाल केला. त्यावर महापौर शिकलगार म्हणाले, कोण घाबरत आहे? घाबरणारी ही औलाद नाही. आम्ही स्वच्छ असल्याने आम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही, अशा शब्दात त्यांनी जामदारांना उत्तर दिले.