शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

सांगली : प्रारूप मतदार याद्या प्रसिद्धीमध्ये घोळ; याद्याच प्रसिद्ध झाल्या नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 11:44 AM

सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्यांकडे लक्ष लागून राहिलेल्या इच्छुकांच्या पदरी मंगळवारी निराशाच आली. प्रशासनाने प्रारुप मतदार याद्याच मंगळवारी प्रसिद्ध केल्या नाहीत. तांत्रिक कारणामुळे याद्या प्रसिद्ध करण्यास विलंब होणार असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे बोट दाखविले आहे. त्यामुळे प्रारुप मतदार याद्या प्रसिद्धीला विलंब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देप्रारूप मतदार याद्या प्रसिद्धीमध्ये घोळयाद्याच प्रसिद्ध झाल्या नाहीत  तांत्रिक कारणामुळे विलंबाची प्रशासनाची कबुली

सांगली : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्यांकडे लक्ष लागून राहिलेल्या इच्छुकांच्या पदरी मंगळवारी निराशाच आली. प्रशासनाने प्रारुप मतदार याद्याच मंगळवारी प्रसिद्ध केल्या नाहीत. तांत्रिक कारणामुळे याद्या प्रसिद्ध करण्यास विलंब होणार असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे बोट दाखविले आहे. त्यामुळे प्रारुप मतदार याद्या प्रसिद्धीला विलंब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली होती. गेल्या पंधरा दिवसात सर्वच पक्षांतील इच्छुकांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालविला आहे. राजकीय पक्षांनीही विविध कार्यक्रम, विकास कामांच्या उद््घाटनाचा सपाटा लावला आहे.इच्छुक उमेदवारांकडून अर्जही मागविले जात आहेत. त्यातच इच्छुकांचे प्रारुप मतदार यादीकडे लक्ष लागले होते. राज्य निवडणूक आयोगाने गेल्याच आठवड्यात मतदार याद्या प्रसिद्धीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार मंगळवारी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. त्यामुळे सकाळपासून इच्छुक उमेदवारांकडून मतदार याद्यांबाबत विचारपूस होत होती.

दुपारपर्यंत मतदार याद्या प्रसिद्ध न झाल्याने इच्छुकांच्या हृदयाचे ठोकेही वाढले होते. आपापल्यापरीने इच्छुकांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मतदार यादीबाबत विचारणाही केली. सायंकाळपर्यंत यादी प्रसिद्ध होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. पण अखेर मंगळवारी प्रारुप मतदार याद्याच प्रसिद्ध होऊ शकल्या नाहीत.याबाबत आयुक्त रवींद्र खेबूडकर व उपायुक्त सुनील पवार यांच्याकडे विचारणा केली असता, तांत्रिक कारणामुळे मतदार यादी प्रसिद्धीला विलंब लागणार असल्याचा खुलासा करण्यात आला.

ते म्हणाले की, महापालिका प्रशासनाने २१ मेपर्यंत अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्राह्य धरून प्रभागनिहाय विभागणी केली. ही यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे.

या प्रारुप यादीतील दुबार नावे वगळण्याचे काम आयोगाच्या स्तरावर सुरू आहे. त्यासाठी मतदार यादीची आॅनलाईन सॉफ्टवेअरद्वारे तपासणी केली जात आहे. या तपासणीला विलंब लागत असल्याने आयोगाकडून प्रारुप यादी प्राप्त झालेली नाही.सायंकाळपर्यंत केवळ तीन प्रभागांची यादी प्राप्त झाली होती. अजून १७ प्रभागांची यादी तपासणीचे काम सुरू आहे. त्यामुळे मतदार यादी प्रसिद्धीला विलंब लागण्याची शक्यता आहे. या याद्या आयोगाकडून तपासणी होऊन आल्यानंतर प्रसिद्ध केल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली