- शरद जाधव
सांगली - शहरातील इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणाऱ्या एका व्यापाऱ्यावर शुक्रवारी सकाळी ईडी ( अमलबजावणी संचनलाय ) च्या दोन पथकांनी छापा टाकून तपासणी सुरू केली. मोठी आर्थिक अनियमितता असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी देखील विविध केंद्रीय तपास यंत्रणांनी या व्यापाऱ्याची तपासणी करण्यात आली होती.
शहरातील सिव्हिल हॉस्पिटलजवळ त्रिकोणीबागे समोर संबंधित व्यापाऱ्यांचा बंगला आहे. व्यापऱ्यांच्या घरावर सकाळी सात वाजता धाड टाकली, दरम्यान धाड पडताच विश्रामबाग पोलिस घटनास्थळी आली होते, मात्र त्यांना सुरक्षेच्या कारणाने अंमलबजावणी संचनलायाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना त्या ठिकाणी येण्यास मज्जाव केला. छाप्याच्या बाबतीत अधिक माहिती देण्यास ईडीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. दुपारी दोन वाजता व्यापाऱ्यांच्या दोन्ही बंगल्यातून हे पथक बाहेर पडले.