सांगली : महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप मतांच्या आकडेवारीतही नंबर एकच ठरला. भाजपला या निवडणुकीत ३ लाख ६३ हजार मते मिळाली, तर काँग्रेस दुसऱ्या व राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या स्थानावर राहिली. मात्र दोन्ही काँग्रेसच्या एकत्रित मतांची बेरीज भाजपपेक्षा दहा हजाराने अधिक आहे.महापालिका निवडणुकीसाठी १० लाख ३३ हजार ३९५ मते वैध ठरली होती. यात भाजपला ३ लाख ६३ हजार ९३ मते मिळाली. त्याखालोखाल काँग्रेसला २ लाख १३ हजार ८७७, राष्ट्रवादीला १ लाख ६१ हजार २९ मते मिळाली. बहुजन समाज पार्टीला ३ हजार ६६६, माकपला ३३३, मनसेला २४८, जनता दलाला ६ हजार ६७, बहुजन मुक्ती पार्टीला ४२१, भारिप बहुजन महासंघाला १ हजार ३३०, राष्ट्रीय समाज पक्षाला ४५४, तर सुधार समितीला १२ हजार ५२८ मते मिळाली.शिवसेना, एमआयएमचा अपेक्षाभंगशिवसेना व एमआयएम हे दोन पक्ष पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीत ताकदीने उतरले होते. शिवसेनेने ५८, तर एमआयएमने ८ जागांवर उमेदवार उभे केले होते. यात शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना मिळून ३७ हजार २०५, तर एमआयएमला ९ हजार ८५८ मते मिळाली.अपक्षांचा बोलबालाया निवडणुकीत १९४ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी वगळता इतर राजकीय पक्षांपेक्षा अपक्ष उमेदवारांना चांगली मते मिळाली आहेत. अपक्षांनी १ लाख ६८ हजार ४६१ मते मिळवित मतांच्या आकडेवारीत चौथ्या स्थानावर झेप घेतली.नोटाला पसंतीअनेक प्रभागात विजयी व पराभूत उमेदवारांतील अंतर कमी राहिले. त्या प्रभागात नोटाला अधिक मतदान झाले. या निवडणुकीत नोटाला एकूण २५ हजार ४४३ मते मिळाली.
Sangli Election (15860) मतांमध्ये सांगली निवडणुकीत भाजपच नंबर एक काँग्रेस दुसऱ्या स्थानी : राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 10:23 PM