Sangli Election राज्य जमेना, ते सांगली काय सांभाळणार: अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 11:25 PM2018-07-29T23:25:22+5:302018-07-29T23:25:56+5:30

Sangli Election State of Jamaica, what Sangli will handle: Ashok Chavan | Sangli Election राज्य जमेना, ते सांगली काय सांभाळणार: अशोक चव्हाण

Sangli Election राज्य जमेना, ते सांगली काय सांभाळणार: अशोक चव्हाण

Next


सांगली : चार वर्षात भाजपने राज्याची अवस्था वाईट केली आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असा जाब विचारण्याची वेळ आली आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जीएसटीने साºयाच घटकांचे कंबरडे मोडले आहे. ज्यांना राज्य सांभाळता येत नाही, ते सांगली काय सांभाळणार, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी रविवारी भाजप व मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले.
सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचारार्थ चव्हाण यांची सभा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. विश्वजित कदम, आ. सतेज पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आ. अब्दुल सत्तार, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, जयश्रीताई पाटील, प्रतीक पाटील, विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे संजय बजाज, श्रीनिवास पाटील उपस्थित होते.
ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजा करू शकले नाहीत. सांगलीत प्रचारालाही येऊ शकले नाहीत. मराठा आरक्षणावरून राज्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. धनगर, मुस्लिम समाजातही नाराजी आहे. मुख्यमंत्र्यांना तोंड दाखवायलाही जागा उरलेली नाही. ते काय सांगलीचा सांभाळ करणार? सांगलीने महाराष्ट्राला दिशा दिली आहे. वसंतदादा, राजारामबापूंपासून ते पतंगराव कदम यांच्यापर्यंत अनेकांनी राज्याचे नेतृत्व केले. त्यामुळे या शहराला बाहेरच्या नेतृत्वाची गरज नाही. चार वर्षात भाजप सरकारने महापालिकेला कसलीही मदत केली नाही. तरीही महापालिकेने २०० कोटीची कामे केली. आता कुणीही येतो व शिव्याशाप देतो, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. येत्या पाच वर्षात काँग्रेस आघाडीच सांगलीत सुवर्णकाळ आणू शकते. सांगलीकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला साथ दिल्यास या शहराच्या विकासाची हमी मी घेतो, असे आश्वासनही त्यांनी दिले.
जीएसटीने व्यापार उद्ध्वस्त झाला आहे. रोजगार कमी झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. चार वर्षात पंधरा हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या, तरी सरकारला जाग येत नाही. ३४ हजार कोटींची कर्जमाफी दिल्याचा डांगोरा पिटला जात आहे. मग आत्महत्या का थांबलेल्या नाहीत? आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर, आम्ही काही तरी करतो आहे, हे दाखविण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे चव्हाण म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले की, चार वर्षांत भाजपचे नेते जे बोलले त्यातील काहीच काम त्यांनी केले नाही. केवळ जाती-धर्मात तेढ वाढविण्याचे काम केले आहे. सांगण्यासारखे काहीच नसल्याने जातीय तणाव वाढविला जात आहे. पुन्हा अच्छे दिन आणायचे असतील, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच पर्याय असल्याचे सांगितले.
भाजपकडून जनतेचा विश्वासघात
देशात महागाई वाढली आहे, व्यापार, उद्योगधंदे बंद पडत आहेत, शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, नोटाबंदीचा त्रास सहन करावा लागला, मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षणाच्या नावाखाली चार वर्षे खेळवत ठेवले. भाजप सरकारच्या काळात एकही घटक समाधानी नाही. जनतेचा विश्वासघात झाला आहे. त्यामुळेच देशात वातावरण बदलत असून, परिवर्तनाच्या या लढाईत सांगलीकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन आ. विश्वजित कदम यांनी केले.

Web Title: Sangli Election State of Jamaica, what Sangli will handle: Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.