सांगली : काही वरिष्ठ अधिकारी आणि नगरसेवकांच्या घरी महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी चाकरी करीत असल्याचा गंभीर आरोप बुधवारी महापालिकेच्या सभेत सत्ताधारी आणि विरोधी गटातील काही सदस्यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित नगरसेवकांचे पद रद्द करण्याबरोबर अधिकाºयांवरही कारवाईची मागणी सदस्यांनी केली.
महापालिकेच्या सभेत भाजपच्या गीता सुतार यांनी हा विषय उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, आरोग्य विभागात वशिलेबाजीने स्वच्छता कर्मचाºयांची नियुक्ती केली जाते. त्यामुळेच नागरिकांची कामे करण्याऐवजी कर्मचारी नगरसेवकांच्या घरातील शौचालय साफ करीत आहेत. यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. अनेकांनी संबंधित नगरसेवकाचे नाव जाहीर करण्याची मागणी केली. त्याबाबत सुतार यांनी राष्टवादीचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांच्यावर आरोप केला. भाजपचे सदस्य विवेक कांबळे यांनीही याला दुजोरा दिला. राष्टवादीचेच नगरसेवक योगेंद्र थोरात म्हणाले की, नगरसेवकांप्रमाणेच अधिकाºयांच्या घरीही काही कर्मचारी काम करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हा प्रकार तातडीने थांबवावा.
अपक्ष नगरसेवक विजय घाडगे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागात ‘पाकीट संस्कृती’ उदयास आल्याची टीका केली. ते म्हणाले की, पैसा व वशिलेबाजी सुरू असल्यामुळे आरोग्याची यंत्रणा विस्कळीत झाली आहे. याल प्रतिबंध करायचा असेल तर, पाकीट संस्कृती बंद करा.राष्टवादीचे विष्णू माने यांनी सांगितले की, याच वशिलेबाजीमुळे गैरहजर कामगारांच्या हजेरी लावल्या जातात आणि हजर असलेल्या कामगारांचे मानधन कापले जाते. सहायक मुकादम, सहायक स्वच्छता निरीक्षक हे प्रकारसुद्धा यातूनच सुरू झाले आहेत.समितीमार्फत निर्णय होणारसमान कर्मचारी वाटपाच्या मागणीवर महापौर सौ. संगीता खोत म्हणाल्या की, याप्रश्नी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात येईल. या समितीमार्फतच सफाई कामगारांची एकूण संख्या, प्रभागांची भौगोलिक स्थिती आणि अन्य बाबींचा विचार करून स्वच्छतेची यंत्रणा उभी करण्यात येईल.समान कर्मचारी वाटपाची मागणीविरोधी गटातील योगेंद्र थोरात, अभिजित भोसले व अन्य सदस्यांनी प्रभागनिहाय समान सफाई कामगारांची नियुक्ती करण्याची मागणी केली. सभागृहनेते युवराज बावडेकर यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भोसले यांनी त्यांच्या प्रभागात असलेल्या जादा सफाई कामगारांचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, एकीकडे काही सदस्यांच्या प्रभागात ७३, तर काही प्रभागात २३ सफाई कामगार नियुक्त केले आहेत.