- अविनाश कोळी सांगली - खासदार फंडातून उभारलेली शिवाजी हौसिंग सोसायटीमधील व्यायामशाळा एका व्यक्तीने बळकावली होती. याविरोधात नागरिकांचा संताप व्यक्त होत असताना माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी नागरिकांना सोबत घेऊन व्यायामशाळेचे कुलूप तोडले. ही व्यायामशाळा पुन्हा नागरिकांच्या ताब्यात दिली. याच परिसरात ऑक्सिजन पार्कमध्ये सुरु असलेले अवैध धंदे व अश्लील चाळे यांचा बंदोबस्त महापालिकेने न केल्यास आंदोलनाचा इशाराही पाटील यांनी दिला.
काँग्रेसचे खासदार विशाल पाटील व माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्या घरामागे असलेल्या शिवाजी हौसिंग सोसायटीमधील खुल्या भूखंडावर खासदार फंडातून व्यायाम शाळा उभारण्यात आली आहे. एका व्यक्तिने ती बळकावली होती. त्या व्यायामशाळेचे कुलूप प्रतिक पाटील यांनी तोडून याची मालकी पुन्हा नागरिकांकडे दिली. तर या भूखंडावर ऑक्सिजन पार्क उभारला आहे, यामध्ये अश्लिल चाळे, दारू-गांज्या, मटणाच्या पार्ट्यांसह गैरप्रकार चालत आहेत. याचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शिवाजी हौसिंग सोसायटीचा खुला भूखंड लहान मुलांना खेळण्यासाठी होता. त्यामुळे या भागातील नागरिकांनी या परिसरातील व्यायामशाळा सुरू करण्याची मागणी तत्कालिन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्याकडे केली होती. प्रतीक पाटील यांनी खासदार फंडातून या ठिकाणी व्यायामशाळा सुरू केली होती. या भागातील तरूण नियमित व्यायाम करत होते. मात्र काही दिवसांपूर्वी एका व्यक्तिने या व्यायामशाळेचा बेकायदेशीर ताबा घेतला. त्यामुळे नागरिकांना व्यायामशाळेत जाता येत नव्हते. रविवारी या परिसरातील नागरिकांनी प्रतीक पाटील यांना भेटून याबाबत तक्रार केली. त्यांनी नागरिकांसह येथे धाव घेत व्यायामशाळेचे कुलूप तोडले.
महिलांच्या तक्रारींची दखल घ्यानागरिकांना विश्वासात न घेता महापालिकेने येथील भुखंडावर ऑक्सिजन पार्क सुरू केले आहे. वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. मात्र हा गैरप्रकाराचा अड्डा बनला आहे. दिवस-रात्र तळीराम येथे दारू पित असतात. गांजा ओढणाऱ्यांचाही वावर असतो. त्यामुळे नागरिकांनी येथे फिरणे कठीण झाले आहे.
महापालिकेविरुद्ध संतापऑक्सिजन पार्कमधील अश्लील प्रकाराबाबत येथील महिलांनी तक्रारी केल्या आहेत. खुल्या भूखंडावरील गैप्रकार रोखावा, अन्यथा मनपाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा प्रतीक पाटील व परिसरातील नागरिकांनी दिला आहे.