शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
3
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
4
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
5
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
6
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
7
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
8
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
9
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
10
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
12
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
13
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
14
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
15
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
16
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
17
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
18
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
19
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
20
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात

सांगली पुराच्या विळख्यातून मुक्त; स्थलांतरित नागरिकांना दिलासा, महापालिकेकडून स्वच्छता सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 11:53 AM

सांगली : बारा दिवसांपासून पुराच्या विळख्यात असलेल्या सांगली शहरातील नागरी वस्त्या बुधवारी पहाटे मुक्त झाल्या. महापालिकेने तातडीने पूर येऊन ...

सांगली : बारा दिवसांपासून पुराच्या विळख्यात असलेल्या सांगली शहरातील नागरी वस्त्या बुधवारी पहाटे मुक्त झाल्या. महापालिकेने तातडीने पूर येऊन गेलेल्या नागरी वस्त्या व नदीकाठावर स्वच्छता, औषध फवारणी सुरू केली आहे.पुरामुळे सांगलीतील २ हजार नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. पूरग्रस्त भागात अद्याप अस्वच्छता व दुर्गंधी असल्याने बहुतांश स्थलांतरित नागरिक परतले नाहीत. निवारा केंद्रात त्यांनी मुक्काम केला आहे. सांगली शहरातील पूर ओसरल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने नदीच्या चारही घाटांची स्वच्छता पूर्ण केली. बारा दिवस पाणी साचून राहिल्याने मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि नदीच्या प्रवाहातून वाहून आलेला कचरा संकलित झाला होता. ७० टन कचरा महापालिकेने गोळा केला.महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे, शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याधिकारी डॉ.रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनूस बारगीर आणि २०० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात आली.

हे भाग झाले पुरातून मुक्तसूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रस्ता, जामवाडी, काकानगर, दत्तनगर येथील सर्व नागरी वस्त्या पुराच्या पाण्यातून मुक्त झाल्या आहेत. या ठिकाणी स्वच्छता व औषध फवारणीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.

पहाटे ओसरला पूरसांगलीत बुधवारी पहाटे सहा वाजता पुराची पातळी २९ फूट ११ इंच झाल्यानंतर नदीच्या घाटासह सर्व नागरी वस्त्या मुक्त झाल्या. दिवसभरात पाणी पूर्णपणे नदीपात्रात गेले. बुधवारी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत नदीपातळी २३ फुटांपर्यंत खाली गेली. मिरजेतील पाणीपातळी ४० फुटांवर आली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर