शहरं
Join us  
Trending Stories
1
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
2
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
3
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
4
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
5
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
6
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
7
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
8
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
9
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
10
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
11
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
12
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
13
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
14
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
15
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
16
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
17
Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
18
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
19
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
20
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS

Sangli: सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालय ‘रामभरोसे’ अनेक पदे रिक्त, डाॅक्टरांची कमतरता

By शीतल पाटील | Published: August 16, 2023 9:47 PM

Hospital: कर्नाटकासह जिल्ह्यातील गोरगरीबांना वरदान ठरलेल्या सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. रुग्णालयातील अनेक पदे रिक्त आहेत.

- शीतल पाटीलसांगली - कर्नाटकासह जिल्ह्यातील गोरगरीबांना वरदान ठरलेल्या सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. रुग्णालयातील अनेक पदे रिक्त आहेत. रुग्णालयात रामभरोसे कारभार सुरू आहे. ठाणे येथील घटनेचा बोध घेऊन रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी होत आहे.

सांगली, मिरज सिव्हिल ७१० बेडचे आहे. या रुग्णालयात दररोज ८०० ते ८५० रुग्ण उपचारासाठी येतात. दोन्ही रुग्णालयातील प्रसुती, मेडिसिन, ऑर्थो व सर्जरी विभाग २४ तास कार्यरत असतात.

सांगलीच्या प्रसुती विभागात महिन्याला ८०० ते ९०० महिला उपचारासाठी येतात. तेथे फक्त दोनच तज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. दोन्ही रुग्णालयातील प्रमुख पद रिक्त आहे. मेडिसिन विभागात महिन्याला अडीच ते तीन हजार रुग्ण उपचार घेत आहेत. या दोन्ही रुग्णालयातआयसीयू फुल्ल असतो. एक बेड सुद्धा रिकामा नसतो. तिथे २८ डाॅक्टरांची गरज आहे. प्रत्यक्षात सात डाॅक्टरच कार्यरत आहेत. ०या विभागात वैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे. ऑर्थो विभागात महिन्याला लहान व मोठया १७०० ते दोन हजार सर्जरी होतात. जवळपास ६० लाख ते ७० लाख रुपयांचे नविन सर्जरीचे साहित्य उपलब्ध आहे. परंतू ते साहित्य वापरणाऱ्या तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. येथेही तीनच डॉक्टर काम करत आहेत. अजून १५ डॉक्टरांची कमतरता आहे. सर्जरी विभागात २१ डाॅक्टरांची गरज असताना केवळ पाच डाॅक्टर उपलब्ध आहेत. याशिवाय नर्सिंग स्टाफ, वर्ग ३ व ४ चे ३५ टक्के कर्मचारी कमी आहेत. यामुळे फार मोठा ताण रुग्णालयावर पडत आहे.

जयंतरावांना निवेदनसांगली, मिरज रुग्णालयातील दुरवस्थेबाबत सामाजिक कार्यकर्ते आसिफ बावा, समीर कुपवाडे, उमर गवंडी, युसूफ जमादार, मुन्ना शेख, शहानवाज फकीर, सरफराज शेख, साहील मगदूम यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. लवकरच वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन सिव्हिलमधील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलSangliसांगली