शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

सांगली---साठ हजारातच विजयाचा गुलाल!

By admin | Published: October 05, 2014 9:26 PM

विधानसभा निवडणूक : पंचरंगी लढतींमुळे पुन्हा १९९९ चा अनुभव; विजयासाठी हवीत अर्धा लाख मते

अविनाश कोळी- सांगली- राज्यात १९९९ मध्ये कॉँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांविरोधात निवडणूक लढली होती. त्यावेळी जिल्ह्यात तिरंगी व चौरंगी लढतीत विजयी उमेदवारांचे मतांचे गणित केवळ ५0 ते ६0 हजारांच्या घरातच होते. यंदाही पंचरंगी व बहुरंगी लढती होत असल्याने पंधरा वर्षापूर्वीच्याच विजयी आकड्यांचा खेळ जिल्ह्यात रंगणार आहे. कॉँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीने स्वबळावर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लढविल्या. त्यामुळे राज्यभर प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची संख्या वाढली. लढतीतही तिरंगी, चौरंगीचे चित्र दिसले. सांगली जिल्ह्यातही तशीच स्थिती होते. तुल्यबळ उमेदवारांची संख्या वाढली की विजयी मतांची संख्याही घटते. मताधिक्याचा आलेखही घटतो. १९९९ मध्ये वाळवा, शिराळा आणि भिलवडी-वांगी हे तीन मतदारसंघ वगळता अन्य सहा मतदारसंघात विजय उमेदवाराला ५0 ते ६0 हजारांच्या घरात मते मिळाली होती. मताधिक्याचे आकडेही कमी झाले होते. गेल्या पंधरा वर्षांत मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली, तरी १९९९ च्या मतांचेच गणित पुन्हा दिसण्याची चिन्हे आहेत. १९९९ मध्ये एकत्र असणारे भाजप-सेनेचे उमेदवारही आता स्वबळावर मैदानात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही अनेक जागा लढवित आहे. बहुजन समाज पक्षासहीत अन्य छोटे पक्षही काहीठिकाणी मैदानात आहेत. अशा परिस्थितीत मतदारांची संख्या वाढूनही विजयी उमेदवाराच्या मतांचे गणित ५0 ते ६0 हजारांच्या घरात राहण्याची चिन्हे आहेत. मताधिक्याचा विचार केल्यास १९९९ मध्ये वाळवा मतदारसंघ वगळता अन्य आठ मतदारसंघातील मताधिक्यांची सरासरी ही १५ हजाराच्या घरात होती. वाळवा मतदारसंघात जयंत पाटील यांना ५३ हजार ९५0 चे मताधिक्य मिळाले होते. सध्याच्या निवडणुकीत पंचरंगी आणि बहुरंगी लढतींचा परिणाम मतांच्या गणितावर होणार आहे. त्यावेळी दिग्गज उमेदवारांनाही निसटता विजय मिळाला होता. यंदा काही मतदारसंघात तशी परिस्थिती आहे.तासगावमध्ये पुन्हा चुरस माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना तासगाव मतदारसंघातून १९९९ च्या निवडणुकीत केवळ ३४९७ चे मताधिक्य मिळाले होते. आर. आर. पाटीलही या मतदारसंघात पाचवेळा निवडून आले आहेत. १९९९ मध्येच त्यांना सर्वात कमी मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी संजय पाटील त्यांच्याविरोधात होते. यंदा आर. आर. पाटील विरुद्ध माजी मंत्री अजितराव घोरपडे अशी लढत असली तरी, घोरपडेंना संजय पाटील यांचीच सर्वाधिक ताकद आहे. त्यामुळे १९९९ चीच स्थिती या मतदारसंघात पुन्हा अनुभवण्यास मिळत आहे. इस्लामपुरात काय होंणार?पूर्वीचा वाळवा व आताच्या इस्लामपूर मतदारसंघात माजी मंत्री जयंत पाटील आजअखेर सलग पाचवेळा निवडून आले आहेत. तरीही त्यांच्या पाच निवडणुकांमधील मतांचा तुलनात्मक अभ्यास केला, तर १९९९ मध्ये त्यांना सर्वात कमी मताधिक्य व मते मिळाल्याची नोंद आहे. यंदा ‘एकास एक’ उमेदवार देण्याचा प्रयत्न चालू होता. सारे विरोधक यंदा एकवटले आहेत. त्यात कॉँग्रेसचाही समावेश आहे. त्यामुळे यंदा या मतदारसंघात मताधिक्य घटणार की वाढणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.पंधरा वर्षांत काय झाले?गेल्या पंधरा वर्षांत सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. कॉँग्रेसचे वर्चस्व असणाऱ्या या जिल्ह्यात १९९९ नंतर राष्ट्रवादीने ताकद वाढविली. नंतर लोकसभा व विधानसभेला आघाडी झाली. तरीही दोन्ही पक्ष ग्रामपंचायतींपासून जिल्हा परिषदेपर्यंत व अन्य सहकारी संस्थांत एकमेकांविरोधात लढत राहिले. जिल्ह्यातील वर्चस्वासाठी दोघांमध्ये चुरस राहिली. गत विधानसभा निवडणुकीत भाजपने याठिकाणी मुसंडी मारत तीन जागा जिंकल्या. लोकसभाही काबीज केली. त्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. शिवसेनेकडेही आता दिग्गज उमेदवार असल्याने तेसुद्धा या शर्यतीत येऊ पाहात आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीला सर्वच मतदारसंघात कडवे आव्हान असल्याने १९९९ पेक्षाही वेगळी स्थिती यंदा दिसणार आहे. राष्ट्रवादीचे बहुतांश नेते भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीचा मतांचा टक्का कमी होण्याची दाट शक्यता आहे. १९९९ मधील मतदारसंघनिहाय स्थितीमतदारसंघविजयी उमेदवारमतेविरोधी उमेदवारमतेमताधिक्यसांगलीदिनकर पाटील (काँग्रेस)५६५७३संभाजी पवार (ज. द.)३३४१५२३१५८मिरजहाफिज धत्तुरे (काँग्रेस)४७२९४बजरंग पाटील (शिवसेना)३३६५७१३६३७तासगावआर. आर. पाटील (राष्ट्रवादी)५५१६६संजय पाटील (काँग्रेस)५१६६९३४९७खानापूर/आटपाडी अनिल बाबर (राष्ट्रवादी)५२२४0रामराव पाटील (काँग्रेस)३0३२४२१९१६वाळवाजयंत पाटील (राष्ट्रवादी)८३११२सी. बी. पाटील (भाजप)२९१६२५३९५0शिराळा शिवाजीराव नाईक (राष्ट्रवादी) ६६३६५सत्यजित देशमुख (काँग्रेस)६0६१९५७४६कवठेमहांकाळ अजितराव घोरपडे (अपक्ष) ५00७५शिवाजीराव शेंडगे (काँग्रेस)३८७९७११२७८जत उमाजी सनमडीकर (काँग्रेस) ५१११८सीताराम व्हनखंडे (राष्ट्रवादी)२६४0२२४७१६भिलवडी/वांगीपतंगराव कदम (काँग्रेस)७९४६६पृथ्वीराज देशमुख (राष्ट्रवादी)६१६३७१७८२९