सांगली जिल्ह्यात वाळूसाठ्याच्या नद्या व ओढे : कृष्णा, येरळा, अग्रणी, महांकाली, कोकळे, बोर, नांदणी, माण, कोरडा,
गावे : ताकारी, दुधोंडी, तुपारी, कारंदवाडी, बहे, नरसिंहपूर, कारंदवाडी, सांगलवाडी, हरिपूर, अंकली, निलजी-बामणी, ढवळी, म्हैसाळ. शिरढोण, विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव, हिंगणगाव, लोणारवाडी-पांडेगाव, भाळवणी, रामापूर, बलवडी, आंधळी, राजापूर, बोरगाव, मोरगाव, निमणी, सावळज, गव्हाण.
प्रशासनाने निश्चित केलेली ठिकाणे : शिवणी, विठलापूर, वाळेखिंडी, सिंगनहळ्ळी, खंडनाळ, मुचंडी, जालिहाळ खुर्द, हिंगणगाव, विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव, सावळज, अंजनी.
सध्या वाळूचा एकही शासकीय ठेका दिलेला नाही. गेल्या पाच वर्षांत फक्त २०१६-१७ मध्ये वाळूचे ठेके दिले गेले. त्यातून शासनाला २४ कोटी ९५ लाखांचा महसूल मिळाला. त्यानंतर आजतागायत वाळू ठेके बंद आहेत. गेल्या पाच वर्षांपासून वाळूचे ठेके व वाहतूक बंद आहे, त्यामुळे वाळू वाहतुकीमुळे अपघात झालेले नाहीत. जिल्ह्यात काही ओढे-नाल्यांतून अत्यल्प प्रमाणात तस्करी सुरू आहे, पण त्यामुळे लक्षणीय प्रमाणात महसूल बुडाल्याची स्थिती नाही. या तस्करीमध्ये काही राजकीय नेते व त्यांचे चेलेच पुढे आहेत. अनेकदा त्यातून हाणामाऱ्या व गुन्हेही दाखल झाले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी म्हणतात, जिल्ह्यात काही औट्यांचे ठेके देण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी १३ ठिकाणे निश्चित केली आहेत. हरित न्यायालयाच्या अटी व शर्तींचे पालन करून ठेके देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
---------