शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सांगलीत ‘वसंतदादा’समोर गुरुवारपासून ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 12:24 AM

सांगली : दत्त इंडिया कंपनीच्या व्यवस्थापनाने वसंतदादा साखर कारखान्यातील दि. १ जुलैपूर्वीची कुठलीही देणी आम्ही देणे लागत नाही,

ठळक मुद्देबैठकीत निर्णय : ‘दत्त इंडिया’ विरुध्द सेवानिवृत्त कामगार आक्रमक हे आंदोलन वाढवण्याचा प्रयत्न केल्यास सेवेतील कामगारही संपात व्यवस्थापनाने चुकीची भूमिका घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन

सांगली : दत्त इंडिया कंपनीच्या व्यवस्थापनाने वसंतदादा साखर कारखान्यातील दि. १ जुलैपूर्वीची कुठलीही देणी आम्ही देणे लागत नाही, अशी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सेवानिवृत्त कामगार शनिवारी संतप्त झाले. देणे लागत नाही, तर वसंतदादा कारखान्याचा बॉयलर आणि यंत्रसामग्री का वापरता, असे विचारत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर कामगारांनी दि. ९ नोव्हेंबरपासून दत्त इंडिया कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या मारण्याचा निर्णय घेतला.

वसंतदादा कारखान्यातील सुमारे सातशे सेवानिवृत्त कामगारांचा थकीत फंड आणि ग्रॅच्युईटीच्या प्रश्नावर येथील कामगार भवनमध्ये शनिवारी बैठक झाली. बैठकीस अ‍ॅड. के. डी. शिंदे, श्रीकांत देसाई, घनशाम पाटील, विष्णू माळी, विलास पाटील, प्रदीप शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत सेवानिवृत्त कामगारांच्या प्रश्नांवर प्राथमिक चर्चा झाल्यानंतर सर्व कामगार वसंतदादा कारखाना चालवण्यास घेतलेल्या दत्त इंडिया कंपनीच्या मुख्य गेटजवळ गेले. तेथे कामगारांनी ‘देणी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘सेवानिवृत्त कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी दत्त इंडिया कंपनीच्या प्रशासनाने सांगितले की, आम्ही जिल्हा बँकेशी करार केला असून, त्यामध्ये दि. १ जुलै २०१७ पूर्वीची कोणतीही देणी देणे लागत नाही.

व्यवस्थापनाने कामगारांसमोर करारपत्रच ठेवले. व्यवस्थापनाच्या भूमिकेमुळे सेवानिवृत्त कामगार आणखी संतप्त झाले. दि. १ जुलैपूर्वीची तुम्ही काही देणी देणार नसाल तर, कारखान्याचा बॉयलर आणि यंत्रसामग्री तुम्ही कशासाठी वापरता? कारखान्याकडून आम्हाला आमच्या हक्काची देणी मिळाली पाहिजेत, यासाठी आमचा लढा चालू आहे. व्यवस्थापनाने चुकीची भूमिका घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अ‍ॅड के. डी. शिंदे यांनी दिला.कामगारांचा आक्रमक पवित्रा पाहून दत्त इंडियाच्या व्यवस्थापनाने लवचिक भूमिका घेतली. कारखान्यामध्ये पुन्हा बैठक झाली. यावेळी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, दत्त इंडियाचे संचालक जितेंद्र धारू, उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे, सेवानिवृत्त कामगारांचे प्रतिनिधी अ‍ॅड. शिंदे, प्रदीप शिंदे आदी उपस्थित होते. व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांची वेळ घेऊन बैठक घेण्यात येईल. बैठकीत जो निर्णय होईल, त्यानुसार कामगारांची देणी दिली जातील, असे आश्वासन दिले.

दत्त इंडिया कंपनीने थकीत देण्याचा चेंडू जिल्हा बँकेच्या कोर्टात टोलविल्यामुळे सेवानिवृत्त कामगार आक्रमक झाले आहेत. दत्त इंडिया आणि जिल्हा बँक काय निर्णय घ्यायचे ते घेऊ देत, आम्ही दि. ९ नोव्हेंबरपासून दत्त इंडियाच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या मारणार आहोत. देणी दिल्याशिवाय हलणार नाही. हे आंदोलन वाढवण्याचा प्रयत्न केल्यास सेवेतील कामगारही संपात उतरतील, असा इशारा अ‍ॅड. के. डी. शिंदे आणि कामगार युनियनच्या पदाधिकाºयांनी दिला आहे.थकीत देणी एकरकमीच पाहिजेतसेवानिवृत्त कामगारांची देणी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे एकाचवेळी ही देणी न देता अन्य देणेकºयांप्रमाणे टप्प्या-टप्प्याने ती देण्याबाबतची चर्चा झाली. दहा टप्पे पाडून देण्यावर दत्त इंडिया कंपनीचे प्रशासन तयार आहे. पण, सेवानिवृत्त कामगारांनी त्यास तीव्र विरोध करून थकीत देणी एकरकमीच मिळाली पाहिजेत, अशी ठोस भूमिका घेतली आहे, अशी माहिती अ‍ॅड. शिंदे यांनी दिली.

टॅग्स :StrikeसंपOrder orderआदेश केणे