जयसिंगपूर : अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जयसिंगपूर येथे छापा टाकून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या हॉटेलचा पर्दाफाश केल्यानंतर शहरात असा व्यवसाय चालविणारे लॉज आता हिटलिस्टवर आले आहेत़ उशिरा का होईना पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे शहरवासीयांतून स्वागत होत असले, तरी सांगली आणि इचलकरंजीचे कनेक्शन शहरातील काही लॉजचालक व महिला पुरविणारे एजंट यांच्याशी असल्यामुळे यावर किती ठोसपणे कारवाई होते याकडे आता लक्ष लागून राहिले आहे़तमदलगेपासून उदगावपर्यंत तसेच शिरोळ बायपास रोडवर लॉजची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे़ कमी वेळेत जादा फायदा मिळविण्याच्या हेतूने काही लॉजचालकांनी वेश्या व्यवसायाशी निगडित असणाऱ्या महिला व एजंटांशी संपर्क साधून हा छुपा व्यवसाय सुरू ठेवला आहे़ गेल्या दोन वर्षांपासून याची व्याप्ती वाढली आहे़स्थानिक पोलिसांकडून जुजबी कारवाईचा प्रकार अनेकदा घडला आहे़ मात्र, पोलिसांनी या व्यवसायाकडे गांधारीची भूमिका घेतल्यामुळे आणि ‘लक्ष्मी’चे दर्शन होत असल्यामुळे या व्यवसायाला अभय मिळत असल्याची चर्चा आहे़ चौंडेश्वरी सूतगिरणीजवळ असलेल्या एका लॉजवर कोल्हापूरच्या पथकाने छापा टाकला होता़ राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे हा प्रकार रात्रीत मिटविण्यात आला होता़ याची शहरात मोठी चर्चाही झाली होती़काही लॉजवर एजंटांच्या माध्यमातून वेश्या व्यवसायाने जाळे निर्माण केले आहे़ इचलकरंजीतील रिक्षाचालक एजंटांच्या माध्यमातून हा व्यवसाय फोफावला आहे़ सांगलीतील मॅडम नावाने ओळखल्या जाणाऱ्या महिलेशी सलगी करून काही व्यापाऱ्यांनी वेश्या व्यवसायाला चालना दिलीे़ जयसिंगपूर-उदगाव मार्गावरील हॉटेल सप्तगिरी लॉजवर वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन तरुणींसह एजंट व हॉटेल व्यवस्थापकावर कारवाई करण्यात आल्यानंतर वेश्या व्यवसायाचे पितळ उघडे पडले आहे़ सप्तगिरी लॉजवरील कारवाई स्वागतार्ह असली, तरी पोलिस उपअधीक्षक रमेश सरवदे वेश्या व्यवसायाला कसा पायबंद घालतात, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे़ (प्रतिनिधी)स्पेशल ब्रँचचे पथककोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या वेश्या व्यवसायावर विशेष कारवाई करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे़ जयसिंगपूर शहरात काही लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाबाबत यापूर्वी नागरिकांनी तक्रारी दिल्याचे समजते़ यामुळे स्थानिक पोलिस व विशेष पथक कशा पद्धतीने कारवाई करते, याकडे लक्ष लागून राहिले आहे़विशेष पथकाच्या कारवाईची वाट न पाहता स्थानिक पोलिसांनी शहरातील वेश्या व्यवसायासह अवैध धंद्याविरोधात कारवाईची धडक मोहीम राबवून अशा व्यवसायाला हद्दपार करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे़ ही जबाबदारी आता जयसिंगपूर उपविभागीय कार्यालयासह स्थानिक पोलिसांची बनली आहे़ ‘ये रे माझ्या मागल्या..’प्रमाणे कारवाई होणार की या व्यवसायाचा बिमोड होणार, याचे उत्तर आता काळच देईल़
वेश्या व्यवसायाचे सांगली-इचलकरंजी कनेक्शन
By admin | Published: May 06, 2016 12:46 AM