शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Sangli: सांगली 'चेंबर'च्या चुरशीच्या निवडणूकीत सत्ताधार्‍यांचीच बाजी, व्यापारी एकता पॅनेलला आठ जागा

By अशोक डोंबाळे | Published: October 11, 2023 11:29 AM

Sangli News: सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या चुरशीने झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी व्यापारी एकता पॅनेलने आठ जागांवर विजय मिळवत सत्ता राखण्यात यश मिळविले. विरोधी व्यापारी विकास आघाडीने जोरदार लढत देत पाच जागांवर विजय खेचून आणला.

- अशोक डोंबाळे  सांगली - सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या चुरशीने झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी व्यापारी एकता पॅनेलने आठ जागांवर विजय मिळवत सत्ता राखण्यात यश मिळविले. विरोधी व्यापारी विकास आघाडीने जोरदार लढत देत पाच जागांवर विजय खेचून आणला.

सांगली चेंबरची निवडणूक यंदा प्रथमच चुरशीची झाली. सांगली बाजार समितीच्या वसंतदादा पाटील सभागृहात मंगळवारी सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत चुरशीने मतदान झाले. चेंबरचे ३६१ सभासद असून त्यापैकी ३५५ सभासदांनी मतदान केले. सायंकाळी मतमोजणीला सुरुवात झाली रात्री साडेदहा वाजता दोन फेऱ्या पूर्ण झाल्या. सत्ताधारी व्यापारी एकता पॅनेलचे नेतृत्व विद्यमान अध्यक्ष शरद शहा यांनी तर विरोधी व्यापारी विकास आघाडी पॅनेलचे नेतृत्व माजी अध्यक्ष अशोक पाटील यांनी केले. रात्री सात वाजता १०० मतांच्या पहिल्या फेरीत विरोधी व्यापारी विकास आघाडीचे आठ तर सत्ताधारी गटाचे पाच उमेदवार आघाडीवर होते. दुसऱ्या फेरीचा निकाल सव्वा दहा  वाजता जाहीर करण्यात आला. दुसऱ्या फेरीमध्ये सत्ताधारी पॅनेलने आघाडी घेतली. त्यांचे आठ उमेदवार पुढे राहिले तर विरोधी एकता पॅनेलचे पाच उमेदवार आघाडीवर राहिले. सत्ताधारी गटाच्या आठही उमेदवारांनी शेवटपर्यंत मतांची आघाडी घेतली. रात्री उशीरा मतमोजणी संपली. यावेळी सत्ताधारी गटाचे आठ तर विरोधी गटाचे पाच उमेदवार विजय झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी जाहीर केले. 

चेंबर ऑफ कॉमर्सचे विजयी उमेदवार सांगली चेंबर निवडणूकमध्ये अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे आणि कंसात मिळालेली मते. रोहित आरवाडे -२२९, गोपाल  मर्दा-२१२, अविनाश अट्टल -२०८, शरद शहा-२०७, अशोक पाटील-२०६, अभय मगदूम -१९२, हरीश पाटील-१८८, समिर साखरे-१८८, विकास मोहीते-१८७, अमर देसाई -१८४, अप्पासाहेब पाटील -१८४, दिपक चौगुले -१८२, सचिन घेवारे -१७७.

टॅग्स :ElectionनिवडणूकSangliसांगली