शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

सांगली : केंद्रीय पथकाकडून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 4:48 PM

सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या तीन सदस्यीय पथकाने आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी, मानेवाडी, माडगुळे, निंबवडे,मुढेवाडी या ठिकाणी भेट देवून पाहणी केली.

ठळक मुद्देकेंद्रीय पथकाकडून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणीपरिस्थिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांशी साधला संवाद

सांगली :  सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या तीन सदस्यीय पथकाने आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी, मानेवाडी, माडगुळे, निंबवडे,मुढेवाडी या ठिकाणी भेट देवून पाहणी केली.यावेळी त्यांनी शेतकऱ्याशी संवाद साधला आणि टंचाई परिस्थती जाणून घेतली.भारतीय खादय निगमचे सहसंचालक सुभाषच्रंद मिना यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय पथकाने जिल्ह्यतील दुष्काळी परिस्थीतीचा आढावा घेतला.

या पथकात पशुधन व दुग्धविकास विभागाचे एल.जी. टेंभुर्ण, विजय ठाकरे यांचा समावेश. पुणे विभागाचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर,कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह , जिल्हाधिकारी वि. ना. काळम, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास दाखल झालेल्या या पथकाने आटपाडी तालुक्यातील काही गावांना भेटी देत शिवरामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यामध्ये त्यांनी ज्वारी, बाजरी, या पिकांची पाहणी केली. यामध्ये त्यांनी करपलेली व उगवण न झालेली पिके, कोरड्या विहीरी, कोरडे ओढे, नाले नजरेखाली घातले. ही सर्व परिस्थिती पाहून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत शासनाला लवकरात लवकर अहवाल सादर करून ही सर्व स्थिती निदर्शनास आणून देण्यात येईल असे सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली यावेळी त्यांनी पाणीपुरवठयावर होणारा परिणाम पशुधन व चा-याची स्थिती व करण्यात येत असलेल्या उपाययोजनासंदर्भातही सांगितले.लेंगरेवाडी, मानेवाडी, माडगुळे, निंबवडे, मुढेवाडी या ठिकाणी विविध ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षापासून पाऊस नसल्याने ज्वारी व बाजरी सारखी पिके करपून गेली तर काही ठिकाणी उगवलिच नसल्याचे सांगितले.

काही ठिकाणी डाळिंबासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून जनावरांना पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पशुधन वाचविणे कठीण झाले आहे. अनेक मेंढपाळ मेंढरांच्या चारा पाण्यासाठी स्थलांतरीत होत असल्याची कैफियत मांडली. व केंद्र शासनाकडून मदत मिळणेबाबत विनंती केली.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारSangliसांगली