सांगली : महापालिकेची निवडणूक...मराठा क्रांती मोर्चाचा जिल्हा बंद...या महत्त्वाच्या घडामोडींमुळे गेली महिनाभर कायदा-सुव्यवस्थेची चिंता करीत खाकी वर्दीतील पोलीस रस्त्यावर राहिले. मतमोजणी, निकाल आणि जिल्हा बंदमुळे पोलिसांना सलग ८४ तास बंदोबस्त करावा लागला. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांच्या नेटक्या नियोजनामुळे सर्व प्रक्रिया शांततेत पार पडली. आता पोलिसांना गणेशोत्सव बंदोबस्ताचे वेध लागले आहेत.महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागताच शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर नाकाबंदीचे पॉर्इंट लावले. या पॉर्इंटवर पोलीस चौक्या उभ्या केल्या. पोलीस कर्मचाऱ्यांना आलटून-पालटून ड्युटी लावण्यात आली होती. पोलिसांवर कामाचा ताण पडू नये, यासाठी त्यांच्या साप्ताहिक सुट्या व रजांवर गदा आणण्यात आली नाही.
गुंडाविरोधी पथकास केवळ गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपविली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने प्रतिबंधात्मक कारवाईवर भर दिला. पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामे थोडी बाजूला ठेवण्यात आली. सायंकाळी सातनंतर प्रत्येक चौकात पोलीस तैनात करण्यात आले होते. नाकाबंदीच्या पॉर्इंटरवरही दररोज नवीन पोलीस नियुक्त केले जात होते. त्यामुळे त्यांनाही फारसा ताण जाणवला नाही.महापालिकेसाठी १ आॅगस्टला मतदान झाले. तत्पूर्वी ३१ जुलैला दुपारी बारा वाजता बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले. तेव्हापासून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याची ड्युटी सुरू झाली. याचदिवशी त्यांनी मतदान केंद्रावरील बंदोबस्ताचा ताबा घेतला. त्या रात्री केंद्रावरच मुक्काम केला.
दुसऱ्यांदिवशी सकाळी सातला मतदान सुरू होणार असल्याने पहाटे पाच वाजता त्यांची ड्युटी सुरूझाली. मतदान यंत्रे जमा करण्यास रात्रीचे दहा वाजल्याने तोपर्यंत ड्युटी करावी लागली. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा ३आॅगस्टला मतमोजणीच्या बंदोबस्तासाठी सज्ज रहावे लागते. यादिवशी सकाळी सात वाजता सांगली, मिरज व कुपवाड शहरात बंदोबस्त लागला. हा बंदोबस्त रात्री बारापर्यंत होता. मराठा क्रांती मोर्चाचा ९ आॅगस्टच्या जिल्हा बंदवेळी संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली.बंदोबस्ताचे तास*३१ जुलैला दुपारी बारापासून ते १ आॅगस्टला मतदान झाल्यानंतर रात्री दहापर्यंत ३४ तास* ३ आॅगस्टला मतमोजणीदिवशी सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत असे १७ तास* ९ आॅगस्टला मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हा बंदवेळी २४ तास* स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनावेळीही बंदोबस्ताचा ताणवादावादीही नाहीमहापालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली. निकालानंतरही अनुचित प्रकार घडला नाही. कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी सोडली, तर मारामारी अथवा वादावादीचे प्रकार घडले नाहीत. जिल्हा बंद काळातही बंदोबस्ताचे नेटके निजोजन झाले. कुठेही दगडफेकीचा प्रकार घडला नाही. बंदोबस्ताचे हे निजोजन पाहून मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांचा सत्कारही केला.