सांगली लोकसभा मतदारसंघात आज महायुतीकडून भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांनी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते, जाहीर सभेत बोलताना खासदार संजय पाटील यांनी काँग्रेसच्याविशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
"सांगलीत दोन दिवसापूर्वी एक अपक्ष अर्ज भरला, त्यांना मी लहान असल्यापासून बघतोय. राजकारणातील परिपक्व नसलेलं नेतृत्व काय तर त्या मुलाकडे आपण सगळी बघतोय, असा टोला खासदार संजयकाका पाटील यांनी काँग्रेस नेते विशाल पाटील यांना लगावला.' त्यांनी मोठं मोठ्या वल्गना केल्या, घोषणा केल्या. त्यांनी १०, २० मुलांना ओरडायला लावलं, असा आरोपही संजयकाका पाटील यांनी केला.
माढ्यात आणखी एक ट्विस्ट, धैर्यशील मोहिते पाटलांना धक्का; अनिकेत देशमुख अपक्ष लढणार
संजयकाका पाटील म्हणाले, पहिले आठ दहा दिवस वातावरण तापत नव्हत, लोकांना वाटायचं आपला पैलवान गरीब आहे, पण आपलं इलेक्शन अगदीच सोपी आहे त्यामुळे लोक म्हणाले शिस्तीत होऊदे. दोन दिवसापूर्वी अर्ज भरला, लोकांचे फोन येऊ लागले अर्ज कधी भरणारा आम्ही आमच्या गाड्या घेऊन येणार आहे एवढ लोकांच प्रेम आहे.
"लोकांच्या आशीर्वादामुळे दहा वर्ष इथं काम करत आहे, मी मोदी साहेबांचा सैनिक म्हणून काम करतोय. सगळ्या पक्षांची शक्ती आपल्या बाजूला आहे. रोज अनेक कार्यकर्ते माझ्यासाठी काम करत आहेत, सत्ता कायमची नसते पण मिळालेलीय सत्ता लोकांसाठी वापरणे महत्वाचे आहे, असंही संजयकाका पाटील म्हणाले.
'दोन वर्षापूर्वी मोठ्या अडचणी आल्या'
" दोन वर्षापूर्वी मला साखरकारखान्याच्या अडचणी आल्या. त्या अजचणीतून मार्ग काढताना लोकांशी संपर्क कमी झाला. एक वर्षामध्ये मी त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर आलो, सगळ्यांनी मला सहकार्य केलं, बँकेचं कर्ज घेतलं. एक साखर कारखाना मी विकला आणि आज डोक्यावर कर्ज खांद्यावर आणून ते जमिनीवर आलेलं आहे, असंही संजयकाका पाटील म्हणाले.