शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

सांगली लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या पथ्यावर, तासगाव-कवठेमहांकाळला विधानसभा समीकरण बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 7:12 PM

प्रभाकर पाटलांच्या लॉन्चिंगने सेटलमेंट थांबली

दत्ता पाटीलतासगाव : यंदाची सांगली लोकसभेची निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली. या निवडणुकीचा निकाल काहीही लागला, तरी ही निवडणूक तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे समीकरण बदलणारी ठरली आहे. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे गटाशी राष्ट्रवादीशी सलगी निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडल्याचे चित्र दिसून येत आहे.काँग्रेसचे विशाल पाटील यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात राहून निवडणुकीत मोठी चुरस निर्माण केली विशाल पाटलांच्या पाठीशी उघडपणे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी पाठबळ उभा केले. आणि कार्यकर्त्यांचा कल पाहून महाविकास आघाडीच्या भूमिकेला बासनात गुंडाळून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदार सुमनताई पाटील यांनीही घोरपडेंच्या सुरात सूर मिसळून विशाल पाटलांसाठी मोर्चेबांधणी केली. त्यामुळे यावेळी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले.यापूर्वी लोकसभा निवडणुकीत अजितराव घोरपडे गट खासदार पाटील यांच्या पाठीशी ठाम उभा राहत होता तर आमदार गटाकडून 'आपलाच आमदार आणि आपलाच खासदार' अशी सेटलमेंटची भूमिका घेऊन सोयीस्कर मतदान केले जात होते. मात्र यावेळी सगळीच राजकीय समीकरणे बदलली आमदार आणि सरकार गटाने एकत्रित येत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी ताकद उभा केली.खासदार पाटील यांचे होमग्राऊंड असले तरी यावेळी आमदार आणि सरकार गट खासदार पाटील यांच्या विरोधात एकत्रित आले. या निवडणुकीचा निकाल काहीही लागला, तरी यानिमित्ताने राष्ट्रवादीचा आमदार सुमनताई पाटील आणि माजी राज्यमंत्री घोरपडे यांचा गट एकत्रित आला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतून विधानसभा निवडणुकीची पायाभरणी झाल्याची चर्चा होत आहे. ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी आगामी विधानसभा करिता पथ्यावर पडणारी ठरली आहे.

प्रभाकर पाटलांच्या लॉन्चिंगने सेटलमेंट थांबलीवर्षभरापूर्वी खासदार संजय पाटील यांनी त्यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांचे विधानसभेसाठी लॉन्चिंग केले. प्रभाकर पाटील वर्षभरापासून तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मशागत करताना दिसून येत होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे निश्चित आहे. मात्र त्यांच्या विरोधात भाजपकडून प्रभाकर पाटील यांचे लॉन्चिंग झाल्यामुळे, राष्ट्रवादीने ' आमचाच आमदार आणि आमचाच खासदार ' असा सेटलमेंटचा अजेंडा थांबवला.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४vidhan sabhaविधानसभाNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohit Patilरोहित पाटिलAjitrao Ghorpadeअजितराव घोरपडे