सांगली : Sangli lok sabha result 2024 सांगलीत सहानभुतीच्या लाटेमुळे अपक्ष उमेदवार विशाल पाटील (vishal patil) यांनी आघाडी घेतली आहे. सांगली लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या फे-यापासून विशाल पाटील यांनी आघाडी घेतली असून, सातव्या फेरीअखेर ४९ हजाराचे मतधिक्य मिळाले. तर नवव्या फेरीत हे लीड कमी होवून ३९४८० इतके झाले. दहाव्या फेरी पुन्हा ४६ हजार ७३२ मतांनी आघाडी घेतली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरुन विशाल पाटील यांच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी जल्लोष सुरु केला. सांगली लोकसभेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सांगली कॉंग्रेसचा बालेकिल्ला असूनही विशाल पाटील यांना उमेदवारी डावलली होती. महाविकास आघाडीची उमेदवारी उद्धवसेनेचे पैलवान चंद्रहार पाटील यांना मिळाल्याने विशाल यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरला होता. त्यामुळे भाजपचे खासदार संजय पाटील, उद्धवसेनेचे चंद्रहार पाटील व अपक्ष विशाल पाटील अशी चुरशीची लढत झाली. एकूण १८ लाख ६८ हजार मतदानापैकी ११ लाख ६३ हजार मतदान झाले होते. गतपंचवार्षिक निवडणुकीपेक्षा मतदान कमी झाल्याने कोणाला फटका बसतो, अशी चर्चा होती. दरम्यान, एक्झिटपोलमध्ये विशाल पाटील यांना कौल दाखविल्यामुळे कार्यकर्त्यांनी विजयाची तयारी केली होती. पोस्टल मतामध्ये खासदार पाटील यांना ४९ मतांची आघाडी दाखविण्यात आली. त्यानंतर मतदानाच्या पहिल्या फेरीपासून सातव्या फेरीतही विशाल पाटील यांनी ४९ हजारांची आघाडी घेतली. मात्र नवव्या फेरीत हे लीड कमी होवून ३९४८० इतके झाले. . दहाव्या फेरी पुन्हा ४६ हजार ७३२ मतांनी आघाडी घेतली.
Sangli lok sabha result 2024: सांगलीत विशाल पाटील यांची आघाडी कायम, समर्थकांचा जल्लोष
By हणमंत पाटील | Published: June 04, 2024 12:13 PM