शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 12:33 PM

Vilasrao Jagtap : सांगलीतली लढत दिवसेंदिवस लक्ष्यवेधी होत चालली आहे. अशातच भाजपच्या माजी आमदाराने जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Sangli Loksabha Election : सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याने सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष तिथं लागलं आहे. महायुतीचे संजयकाका पाटील, महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याच ही लढत होणार आहे. काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील हे बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू नये यासाठी जयंत पाटील यांनीच खेळी केल्याचा आरोप भाजपच्या माजी आमदाराने केला आहे.

सांगलीत भाजपकडून संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांना पक्षातूनच विरोध सुरु झाला होता. यामध्ये सगळ्यात पुढे हे जतचे माजी आमदार विलास जगताप होते. संजयकाकांच्या उमेदवारीमुळे विलास जगताप यांनी पक्षाला रामराम केला. भाजपचा राजीनामा देताना विलासराव जगताप यांनी थेट काँग्रेसच्या विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर आता एका प्रचारसमभेदम्यान विलास जगताप यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्यावर आरोप केले.

सांगलीतील काँग्रेसची जागा जाण्यामागे जयंत पाटील हे खलनायक होते असा गंभीर आरोप जतचे माजी आमदार विलास जगताप यांनी केला आहे. विशाल पाटलांच्या उमेदवारीबाबतही विलास जगताप यांनी जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

" एक काळ असा होता जेव्हा वसंतदादा पाटील यांच्या खिशात सगळ्या महाराष्ट्राची तिकीटे होती. आणि आज त्यांच्याच नातवाला मुंबई, पुणे, नागपूर असे हेलपाटे घालावे लागत आहेत. ही अतिशय दुःखद घटना आहेत. या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत. काँग्रेसवाले तिकीट मागत होते तर त्यांना डच्चू दिला गेला. या सगळ्या खेळी  संजय राऊतांच्या माध्यमातून जयंत पाटील यांनी केल्या आहेत. वसंतदादा यांचे घराणे राजकाराणातून संपवण्याचा घाट या जिल्ह्यातील नेतृत्वाने घातला आहे, असा आरोप विलास जगपात यांनी केला. 

टॅग्स :sangli-pcसांगलीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Jayant Patilजयंत पाटीलSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेस