सांगली , दि. १६ : माधवनगर रस्त्यावरील शिवोदयनगर आणि माधवनगर (ता. मिरज) येथे धुमाकूळ घालणाऱ्या टोळीतील एकास अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथे पकडण्यात आले आहे. तिघांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले. शामू राजू चव्हाण (वय ४५, रा. जत) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याला ग्रामस्थांनी बेदम चोप दिला आहे.
शुक्रवारी मध्यरात्री भरपावसात धुमाकूळ घालत चोरट्यांनी आठ घरे फोडली. अनेक घरांना बाहेरुन कड्या लाऊन घेतल्याने नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. ज्येष्ठ पत्रकार दिलीप भिसे यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ६० हजाराचा ऐवज चोरट्यांच्या हाती लागला. भिसे यांच्या शेजारी पत्रकार अविनाश कोळी यांच्या घराच्या दरवाजचे ग्रील कापण्याचा प्रयत्न केला. याचठिकाणी अरुण गायकवाड यांच्या घराचे प्रवेशद्वार चोरट्यांनी तोडले.
माधवनगरमध्ये भगत गल्लीतही चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला होता. अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथेही याच टोळीने शनिवारी मध्यरात्री धुमाकूळ घातला. दिवाळीनिमित्त लावण्यात आलेल्या एका फटाटे स्टॉलवर त्यांनी चोरीचा प्रयत्न केला. तिथे स्टॉलचा मालक झोपला होता. त्याने आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेतली. तेवढ्यात शामू चव्हाणसह चौघांनी पलायन केले. ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केला. यातील शामू चव्हाणला पकडण्यात यश आले. अन्य तिघांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले.
सिव्हिलमध्ये दाखलग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याने शामू चव्हाण हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याठिकाणी शिरोळ पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले आहे. तो जखमी असल्याने पोलिसांना त्याची अजून चौकशी करता आली नाही. त्याचे पळून गेलेले साथीदार जतमधील असण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने तपास करण्यासाठी शिरोळ पोलिसांचे पथक जतला रवाना झाले आहे.संजयनगर पोलिस अनभिज्ञसंजयनगर पोलिस ठाण्याच्याहद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घालून आठ घरे फोडल्याची घटना घडली. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे शिरोळ पोलिसांनी टोळीतील एकास पकडले. पण या कारवाईबाबत संजयनगर पोलिस अनभिज्ञ हो