शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरण: मृत्युकांडानंतर रडायलाही कुणी उरलं नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 1:38 PM

भावा-भावांत मरेपर्यंत सुसंवाद, जिल्ह्यातील सर्वात मोठे मृत्युकांड

संतोष भिसे/सुशांत घोरपडेसांगली-म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांच्या आत्महत्येने रडायलाही रक्ताचे कोणी उरले नाही. उच्चशिक्षित आणि सधन कुटुंबाने एकाच वेळी जीवनयात्रा संपविल्याने पोलीस प्रशासनापुढे तपासाचे आव्हान दिसत आहे. डॉ. माणिक आणि पोपट यल्लाप्पा वनमोरे यांनी कुटुंबासह केलेल्या आत्महत्येमागे कर्ज, सावकारांकडून त्रास, करणी-धरणी, अविचारी गुंतवणूक अशी अनेक कारणे चर्चेत असली, तरी पोलीस अधिकारी घटनास्थळी काहीही बोलत नव्हते.

वनमोरे यांची दोन्ही कुटुंबे उच्चशिक्षित आणि सधन होती, त्यामुळेही घटनेमागील कारणांविषयी मोठी चर्चा सुरू होती. घटनास्थळावरील दृश्य विदारक होते. बँकेत नोकरी करणारी पोपट यांची मुलगी अर्चना शनिवारीच कोल्हापुरातून आजीसह घरी परतली होती. रविवारी रात्री झोपण्याच्या कपड्यात असतानाच तिला विषाचा त्रास होऊ लागला, त्यामुळे ती स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी गेली व तेथेच कोसळली असावी.पोपट यांचा मृतदेह हॉलमध्ये सोफ्याजवळ पडला होता, तर पत्नी संगीता बेडरूममध्ये पडल्या होत्या. अर्चनाची स्थिती पाहता विषप्रयोगाविषयी तिला माहिती नसावी अशी शक्यता आहे. डॉ. माणिक यांच्या घरातही मुले आदित्य, प्रतिमा आणि शुभम यांना याची कल्पना नसावी, असे चित्र होते. सोमवारी दुपारी घटना समजल्यानंतर भावकीतील महिलांचा बंगल्याबाहेर आक्रोश सुरू होता.डॉ. माणिक म्हैसाळ पंचक्रोशीत जनावरांवरील उपचारांसाठी प्रसिद्ध होते. गावात सामाजिक क्षेत्रातही त्यांचा वावर होता. एका पतसंस्थेचे ते विद्यमान संचालक होते. वडिलार्जीत दोन एकर शेती काही वर्षांपूर्वीच विकली होती. जुन्या घरात आई आक्काताई राहायची, तर दोन्ही भाऊ कुटुंबासह आपापल्या बंगल्यात राहायचे. आक्काताई तेथेही राहायला जायच्या. त्या काही दिवसांपूर्वी नात अर्चनाच्या सोबतीला म्हणून कोल्हापुरात गेल्या होत्या. आता कुटुंबातील सर्वांचा मृत्यू झाल्याने यल्लाप्पा वनमोरे यांचा निर्वंश झाला आहे.चित्रकलेच्या शिक्षकाने जीवनात रंग भरलेच नाहीतपोपट वनमोरे बेडग (ता. मिरज) येथे रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये चित्रकलेचे शिक्षक होते. आष्टा येथून सहा-सात वर्षांपूर्वी बदलून आले होते. विद्यार्थ्यांना बालमानसशास्त्राचे धडेही द्यायचे. शाळेत विद्यार्थ्यांपुढे चित्रात रंग भरणाऱ्या पोपट यांना स्वत:च्या आयुष्यात मात्र रंग फुलविता आले नाहीत.‘योग’ कशाचा?

म्हैसाळमध्ये वनमोरे भावकीची सुमारे साठ-सत्तर घरे आहेत. पैकी यल्लाप्पा वनमोरे यांची गावात आणि नरवाड रस्त्यावर जुनी घरे होती. कुटुंबाचा विस्तार वाढेल, तसे पोपट आणि डॉ. माणिक यांनी अनुक्रमे शिवशंकरनगर आणि अंबिकानगरमध्ये बंगले बांधले. पोपट यांचा ‘योग’ बंगला टुमदार आहे. घरातील सजावटदेखील कल्पक व आकर्षक आहे. बंगल्याचे योग नाव ॲक्रिलीकमध्ये तयार केले असून रविवारी रात्रीपासून त्यातील दिवा सुरूच होता.भावा-भावांत मरेपर्यंत सुसंवाद

मोठे पोपट आणि लहान माणिक या भावांत विलक्षण सुसंवाद होता. दोघांची घरे काही अंतरावर असली, तरी दररोजचे येणेजाणे होते. महत्त्वाचे निर्णयदेखील एकत्रच घ्यायचे. जीवनयात्रा संपविण्याचा निर्णयदेखील याच पद्धतीने एकत्रित घेतल्याची चर्चा गावात होती. शुभम आजी आक्काताईला सोडण्यासाठी रात्री चारचाकीतून चुलते डॉ. माणिक यांच्या घरी गेला होता, तो परतलाच नाही.जिल्ह्यातील सर्वात मोठे मृत्युकांड

आसंगी तुर्क (ता. जत) येथे २००२ मध्ये पाच जणांना जाळून मारण्यात आले होते. आरग (ता. मिरज) येथे २००६ मध्ये गाडे कुटुंबातील सहा जणांची हत्या झाली होती. त्यानंतर म्हैसाळमधील वनमोरे मृत्युकांड सर्वात मोठे ठरले आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस