शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

सांगली, मिरजकरांनो! पाणी जपून वापरायला हवे..!

By admin | Published: October 29, 2015 11:58 PM

मोहीम राबविण्याची वेळ : शहरांमध्ये होत आहे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय; दररोज हजारो लिटर पाणी गटारीत--जागतिक काटकसर दिन

शरद जाधव - सांगली--पाचहून अधिक तालुक्यात ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी टॅँकरची संख्या वाढत जाते... पाण्याअभावी जनावरांची तडफड होते... केवळ जमिनीलाच नव्हे, तर काळजालाच चिरा पाडणारा दुष्काळ मानगुटीवर बसला असताना जिल्ह्यातील एका भागाला मात्र याची जाणीव नसते... गाडी धुण्यासाठी तासभर पाणी सुरू असते... सार्वजनिक नळ सुरू असतात. मग प्रश्न पडतो की, तीव्र पाणी टंचाई शहरात अनुभवास आली तर?... ती येऊ नये म्हणूनच पाण्याची नासाडी थांबवून ते काटकसरीने वापरावे लागेल...‘जागतिक काटकसर दिन’ शुक्रवारी साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एका भागात होणारी पाण्याची बेसुमार नासाडी आणि त्याचवेळी दुसऱ्या भागात घागरभर पाण्यासाठी होणारी मैलो न् मैल भटकंती नक्कीच विचार करायला लावणारी आहे.दिवसेंदिवस पाण्याचे स्रोत कमी होत असताना पाणी वाचविण्यासाठी मोहीम राबविण्याची वेळ आली आहे. पाण्याच्या अनिर्बंध वापरासाठी शासकीय धोरणेही कारणीभूत आहेत. ग्रामीण भागात दरडोई ४० लिटर पाण्याची व्यवस्था होते; तर शहरात ८० लिटरपर्यंत मर्यादा वाढते. मोठ्या शहरात हीच मर्यादा १२० लिटरपेक्षा जादा असल्याने पाण्याचा सर्वच ठिकाणी एकच वापर असताना मर्यादेमुळे पाण्याचा वारेमाप वापर होतो. बाटलीबंद पाण्याची किंमत आणि सार्वजनिक पाणीपुरवठ्याची बिले पाहिली की पाण्याचे महत्त्व दिसून येईल. आता केवळ सामाजिक पातळीवर नव्हे, तर व्यक्तिगत पातळीवरही पाणी वाचविण्याची चळवळ प्रभावीपणे राबविण्याची वेळ आली आहे. प्रत्येकाने पाण्याचा वापर जबाबदारीने आणि मौल्यवान वस्तूप्रमाणे करावा. - डॉ. रवींद्र व्होरा, पर्यावरणतज्ज्ञया गोष्टी कधी थांबणार?एका घरात किमान पाच अंतर्गत नळजोडण्या म्हटल्या तरी, त्यांच्यातून होणारी थेंब थेंब गळतीही पाणी नासाडीला आमंत्रणच देते. वर्षभरात केवळ शंभर ते दीडशे रुपयांचा देखभाल खर्च केला तरी ती थांबू शकते. केवळ दुर्लक्ष केल्याने पाण्याचे नळ दिवस-दिवसभर सुरू राहतात. हॉटेलमध्ये दिलेले पाणी गरजेपुरते न घेता ग्लास भरून पाणी घेतले जाते व घोटभर पिऊन उरलेले पाणी फेकून दिले जाते. एक-दोन महिन्यापूर्वी पॅकिंग केलेल्या पाण्याच्या बाटल्यांवर वारेमाप खर्च करणारी व्यक्ती, घरात मात्र दररोज नव्याने नळाला आलेले पाणी भरायला प्राधान्य देते. उरलेले पाणी शिळे झाले म्हणून गटारीत ओतले जाते. सार्वजनिक नळांवर दिवसभर नळ सुरू असतात. नळाखाली लावलेले भांडे कित्येक तास भरून वाहत असते. शहरात होत आहे पाण्याची नासाडीशहरातील दिनचर्येचा विचार केला तर, छोट्या-छोट्या गोष्टींमुळे पाण्याची मोठी नासाडी होते. अपार्टमेंटसह इमारतीमधील पाण्याची टाकी भरण्यासाठी रात्री सुरू केलेली मोटार सकाळपर्यंत सुरूच असते. रात्रीत हजारो लिटर चांगले पाणी केवळ योग्यवेळी मोटार बंद न केल्याने गटारीत मिसळते. शहरात दुचाकी व चारचाकी गाड्या धुण्यासाठीही अमर्याद पाण्याचा वापर होतो. केवळ एका बादलीभर पाण्यात स्वच्छ होणारी मोटारसायकल धुण्यासाठी तासतासभर पाण्याचा फवारा विनाकारण सुरू ठेवला जातो.