सांगली : महापालिका निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे घोडे गंगेत न्हाले असले तरी, मिरजेतील प्रभाग ५ व सांगलीवाडी या दोन प्रभागातील ५ जागांवर आता दोन्ही काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत, तर मिरजेतील प्रभाग क्रमांक चार भाजपचे बंडखोर अनिलभाऊ कुलकर्णी यांच्यासह अपक्षांसाठी सोडण्यात आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार यादीनंतर बंडोबांनी दंड थोपटले असून काहींनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आघाडी आणि भाजपमध्ये यंदा जोरदार ‘टशन’ पाहायला मिळणार आहे.
गेल्या चार दिवसांपासून बैठकांवर बैठका होऊनही काँग्रेस-राष्ट्रवादीत परिपूर्ण आघाडी होऊ शकली नाही. दोन्ही बाजूंनी काही जागांवर बरीच ताणाताणी झाली. विशेषत: मिरजेतील प्रभाग पाचमध्ये राष्ट्रवादीकडून माजी महापौर इद्रिस नायकवडी व मालन हुलवान इच्छुक होते, तर काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार यांचे पुत्र करण जामदार यांनीही दावा केला होता. या प्रभागात आघाडीबाबत चार दिवस बरीच खलबते झाली. पण त्यातून तोडगा निघू शकला नाही. अखेर या प्रभागात मैत्रीपूर्ण लढत करण्याचा निर्णय बुधवारी सकाळी घेण्यात आला.
दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना एबी फॉर्म देत अर्ज भरण्यास सांगितले. त्यामुळे याठिकाणी लढत ‘हाय व्होल्टेज’ बनली आहे. सांगलीवाडीतील तीन जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना तोडगा काढता आला नाही. सांगलीवाडीतून नगरसेवक दिलीप पाटील यांनी तीनही जागा लढविण्याचा आग्रह धरला, तर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हरिदास पाटील यांनीही तसाच दावा केला. त्यामुळे येथे मैत्रीपूर्ण लढत होत आहे. दिलीप पाटील, शुभांगी अशोक पवार, महाबळेश्वर चौगुले यांनी काँग्रेसकडून, तर हरिदास पाटील, अभिजित कोळी, नूतन कदम यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज भरले. मिरजेतील ब्राम्हणपुरीच्या प्रभाग चारमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने अपक्ष नगरसेवक अनिलभाऊ कुलकर्णी यांना पाठबळ देण्याचा निर्णय घेतला.काँग्रेस, राष्ट्रवादीची : उमेदवार यादी...प्रभाग १ - शेडजी मोहिते, रईसा रंगरेज, पद्मश्री प्रशांत पाटील, धनपाल खोत, प्रभाग २ - सविता मोहिते, वहिदा नायकवडी, कुमार पाटील, महावीर खोत, प्रभाग ३- प्रतीक्षा सोनवणे, अजित दोरकर, यास्मीन चौधरी, सचिन जाधव, प्रभाग ६ मैनुद्दीन बागवान, रझीया काझी, नर्गिस सय्यद, अतहर नायकवडी, प्रभाग ७ - बसवेश्वर सातपुते, धोंडूबाई कलकुटगी, जयश्री म्हारगुडे, किशोर जामदार, प्रभाग ८- सुनीता जगधने, स्नेहा औंधकर, विष्णू माने, रवींद्र खराडे, प्रभाग ९ - मनगू सरगर, मदिना बारुदवाले, रोहिणी पाटील, संतोष पाटील, प्रभाग १० - उत्तम कांबळे, वर्षा अमर निंबाळकर, गीता पवार, प्रकाश मुळके, प्रभाग ११ - कांचन कांबळे, मनोज सरगर, शुभांगी साळुंखे, उमेश पाटील, प्रभाग १२ -विशाल हिप्परकर, दीपाली सूर्यवंशी, स्वाती सूर्यवंशी, अजित सूर्यवंशी, प्रभाग १४ - प्रमोद सूर्यवंशी, प्रियांका सदलगे, शैलजा कोरी, संजय (चिंटू) पवार, प्रभाग १५ - फिरोज पठाण, आरती वळवडे, पवित्रा केरीपाळे, मंगेश चव्हाण, प्रभाग १६ - हारुण शिकलगार, पुष्पलता पाटील, रूपाली चव्हाण, उत्तम साखळकर, प्रभाग १७ - मृणाल पाटील, स्नेहा कबाडगे, दिग्विजय सूर्यवंशी, धनंजय कुंडले, प्रभाग १८- ज्योती आदाटे, बिसमिल्ला शेख, अभिजित भोसले, राजू गवळी, प्रभाग १९- कांचन भंडारे, प्रियांका बंडगर, युवराज गायकवाड, गजानन मिरजे, प्रभाग २०- योगेंद्र थोरात, प्रियांका पारधी, संगीता हारगे.दोन प्रभागात मैत्रीपूर्ण लढतमिरजेतील प्रभाग ५ मध्ये संजय मेंढे, बबिता मेंढे, नाजवीन पिरजादे, करण किशोर जामदार यांना काँग्रेसने, तर मालन हुलवान, इद्रिस नायकवडी यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली.सांगलीवाडीतील प्रभाग १३ मधून राष्ट्रवादीतर्फे अभिजित कोळी, नूतन कदम, हरिदास पाटील आणि काँग्रेसकडून महाबळेश्वर चौगुले, शुभांगी पवार, दिलीप पाटील यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे.मिरजेच्या ब्राह्मणपुरीतील प्रभाग चारमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने उमेदवारच दिलेले नाहीत. अपक्ष अनिल कुलकर्णी गटाला चारही जागा सोडल्या आहेत.काँग्रेस-राष्टवादीच्या आघाडीचा निर्णय झाल्यानंतर दोन्हीकडील नेत्यांनी हात उंचावत आनंद व्यक्त केला. यावेळी डावीकडून सुरेश पाटील, सतेज पाटील, जयंत पाटील, विश्वजित कदम, प्रतीक पाटील, पृथ्वीराज पाटील, संजय बजाज आदी उपस्थित होते.