शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

विकसित भारत अभियानात सांगली महापालिका राज्यात आघाडीवर

By अविनाश कोळी | Published: January 24, 2024 4:58 PM

लोकसहभागासह अनेक विभागात पहिल्या क्रमांकावर विराजमान

सांगली : विकसित भारत संकल्प अभियानांतर्गत मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेने महाराष्ट्रातील ड वर्ग महापालिकांमध्ये अव्वल स्थान पटकाविले आहे. दुसऱ्या स्थानी पनवेल तर तिसऱ्या स्थानी कोल्हापूर महापालिका आहे.विकसित भारत संकल्प यात्रा हा एक शासकीय उपक्रम आहे. आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, पीएम सुरक्षा विमा, पीएम स्वनिधी आदी प्रमुख केंद्र शासनाच्या योजनांबद्दल नागरिकांत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्या योजनांच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. योजनेपासून वंचित घटकांपर्यंत पाेहोचण्याचाही उद्देश यात आहे.योजनेंतर्गत राज्यभरातील महापालिकांना यात्रेचा कार्यक्रम ठरवून दिला होता. यात ड वर्गातील १९ पैकी १६ महापालिकांनी यात्रा पूर्ण केली. यात भिवंडी, जळगाव व चंद्रपूर अशा तीन महापालिकांचा कार्यक्रम दोन दिवसांत संपणार आहे.

अंतिम यादीतही सांगलीची आघाडी शक्यसंकल्प यात्रा अपूर्ण असलेल्या महापालिकांची आकडेवारी पाहिली तर अंतिम यादीतही सांगली महापालिकाच अव्वल राहण्याची शक्यता आहे. तीन वेगवेगळ्या गटात सांगली अव्वल आहे. पनवेल दोन गटात तर अन्य महापालिकांना एकाच गटात वर्चस्व राखता आले आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेला सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत चांगला प्रतिसाद मिळाला. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या परिश्रमातून हे यश मिळाले आहे. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याची कर्तव्य भावना यापुढेही जपली जाईल. - सुनील पवार, आयुक्त, सांगली, मिरज, कुपवाड महापालिका

टॅग्स :Sangliसांगली