सांगली महापालिकेचे २०१९-२०२० चे ७५० कोटी रुपये जमेचे आणि ४१.८७ लाख शिलकीचे प्रशासकीय अंदाजपत्रक आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी शुक्रवारी स्थायी समिती सभेत सादर केले. प्रशासनाने यंदा कोणतीही करवाढ प्रस्तावित केलेली नाही. या अंदाजपत्रकात कॉल सेंटर उभारून नागरिकांना सुविधांसह बेरोजगारांना रोजगार उभारणी करण्यासाठी काही योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
खेबुडकर म्हणाले, अंदाजपत्रकात विविध कर रूपाने ७५० कोटी रुपये जमा होणार आहेत. तर एकूण खर्च ७४९ कोटी ७९ लाख ६० हजार ९१९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अंदाजपत्रकात कोणताही फुगवटा न करता वास्तवतेचे भान ठेवले आहे. यामध्ये प्रामुख्याने शासनाकडून सर्व रेकॉर्डचे विलगीकरण (ऑनलाईन) करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार सहा बंडल सिस्टिमनुसार सर्व जुनी कागदपत्रांचे रेकॉर्ड ठेवले जाईल. संपूर्ण संगणकीकृत यंत्रणेसाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.