शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सांगली महापालिकेमध्ये लुटारू भाजपला थारा देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 11:45 PM

सांगली : केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपकडून सर्वसामान्यांची अक्षरश: लूट सुरू आहे. वाढत्या महागाईमुळे गोरगरिबांचे हाल करणाऱ्या भाजपला राज्याच्या व केंद्राच्या सत्तेतून हद्दपार करण्याची सुरूवात महापालिका निवडणुकीपासूनच करायची आहे. कॉँग्रेसने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर कॉँग्रेसचा विजय निश्चित असून, जनतेने लुटारू भाजपला महापालिका निवडणुकीत थारा देऊ नये ...

ठळक मुद्देपृथ्वीराज पाटील : कॉँग्रेसच्या जनसंपर्क अभियानास प्रारंभ

सांगली : केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपकडून सर्वसामान्यांची अक्षरश: लूट सुरू आहे. वाढत्या महागाईमुळे गोरगरिबांचे हाल करणाऱ्या भाजपला राज्याच्या व केंद्राच्या सत्तेतून हद्दपार करण्याची सुरूवात महापालिका निवडणुकीपासूनच करायची आहे. कॉँग्रेसने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर कॉँग्रेसचा विजय निश्चित असून, जनतेने लुटारू भाजपला महापालिका निवडणुकीत थारा देऊ नये असे आवाहन कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सोमवारी सांगलीत केले.

कॉँग्रेसच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या प्रभागनिहाय जनसंपर्क अभियानाची सुरूवात सोमवारी मराठा समाज भवनात झाली. यावेळी कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, जयश्रीताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील पुढे म्हणाले की, महापालिका क्षेत्रातील जनतेने कॉँग्रेसवर दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून विकासकामे केली आहेत. गेल्या पाच वर्षात २०० कोटी रूपयांहून अधिक कामे पूर्ण केली असल्याने पुन्हा एकदा कॉँग्रेसचा विजय होण्यास अडचण येणार नाही. महापालिका निवडणुकीत साठ जागा मिळवू, अशी घोषणा करणाºया भाजपला दोनआकडी संख्याही गाठू देणार नाही.

अभय छाजेड म्हणाले की, पाच वर्षापूर्वी सत्तेत येण्यापूर्वी कॉँग्रेसने दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती झाली आहे. पाच वर्षात महापौर हारूण शिकलगार व कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांनी स्वच्छ व पारदर्शी कारभार केल्याने या निवडणुकीत कॉँग्रेसचा विजय निश्चित आहे.

यावेळी प्रभाग १५ मधील इच्छुक उमेदवारांनी आपला परिचय करून देत उमेदवारी देण्याची मागणी नेत्यांकडे केली. यात प्रामुख्याने मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, किशोर लाटणे, रहीम हट्टीवाले, सुजाता भोकरे, सलमा शिकलगार, स्मिता यमगर, अंजूम शेख, कलावती पवार, आरती वळवडे, सरला कांबळे यांच्यासह इतर इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. यावेळी महापौर हारूण शिकलगार, महापालिकेचे गटनेते किशोर जामदार, विशाल पाटील, सिद्धार्थ जाधव आदी उपस्थित होते.इच्छुकांचे शक्तिप्रदर्शनप्रभाग क्रमांक १५ मधून कॉँग्रेसतर्फे इच्छुक असणाºया उमेदवारांनी नेत्यांसमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. उमेदवार ओळख करून देत असताना त्यांचे समर्थक टाळ्या, शिट्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देत होते. मंगेश चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण