शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात सांगली महापालिका 'टॉप टेन'मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 5:34 PM

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात सांगली महापालिकेने देशात ३६ वा तर राज्यात ९ वा क्रमांक पटकाविला आहे. गतवर्षी देशात १०६ व्या क्रमांकावर असलेल्या महापालिकेने यंदाच्या सर्वेक्षणात हनुमान उडी घेतली आहे.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षणात राज्यात सांगली महापालिका 'टॉप टेन'मध्ये देशात ३६ वा क्रमांक : गतवर्षी १०६ व्या क्रमांक

सांगली : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात सांगली महापालिकेने देशात ३६ वा तर राज्यात ९ वा क्रमांक पटकाविला आहे. गतवर्षी देशात १०६ व्या क्रमांकावर असलेल्या महापालिकेने यंदाच्या सर्वेक्षणात हनुमान उडी घेतली आहे.आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळे पहिल्यांदाच महापालिका राज्यात 'टॉपटेन'मध्ये पोहोचली आहे. २०१८ साली महापालिका देशात ११९ व्या तर २०१९ मध्ये १०६ व्या क्रमांकावर होती. गतवर्षी शहराला महापुराचा मोठा फटका बसला होता.

महापूरातून सावरण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी गेला. त्यानंतर महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे तयारी सुरू केली. आयुक्त कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभाग सक्रिय झाला. उपायुक्त स्मृती पाटील यांच्यावर अभियानाची जबाबदारी सोपवण्यात आली.

आरोग्याधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, डॉ. रविंद्र ताटे व त्यांची टीम सोबतीला होती. महापालिकेने शहरातील झोपडपट्ट्यांची रंगरूपच पालटून टाकले. सार्वजनिक शौचालयांची रंगरंगोटी, दुरुस्ती करण्यात आली.

मैला साफ करणे आणि वाहतूक, सार्वजनिक सौंदर्यीकरण, विद्यार्थी आणि नागरिक सहभाग, स्वच्छता अ‍ॅप, सार्वजनिक स्वच्छता, कचरा घंटागाड्या, कचरा कोंडाळी, पाणी व्यवस्थापन, सांडपाण्याचा पुनर्वापर, घातक कचरा, कचऱ्याचे इतर प्रकार आणि त्यावरील प्रक्रिया, सार्वजनिक पाणवठ्यांची स्वच्छता इत्यादी क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी केली. या अभियानात प्रशासन एकाकी कष्ट घेत होते. अखेर या प्रयत्नांना यश आले असून पहिल्यांदाच देशात 36 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.कंटेनरमुक्त शहराचे उद्दिष्ट : पाटीलयंदा कंटेमरमुक्त व शंभर टक्के शौचालय़ुक्त शहर करण्याचा संकल्प होता. त्यादृष्टीने नियोजनही केले होते. पण कोरोनामुळे या कामांना ब्रेक लागला आहे. तरीही आम्ही कचरामुक्त शहर, रस्त्यांची स्वच्छता, प्लास्टिक व दैनदिंन कचर्‍यावर प्रक्रिया करुन शहराचे सौंदर्य वाढविण्यावर भर राहिल अशी प्रतिक्रिया उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान