शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

सांगली महापालिकेतील भाजप पर्वास जल्लोषात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:26 PM

सांगली : पावसाच्या कोसळणाऱ्या सरी, फटाक्यांची आतषबाजी, तसेच नाशिक व धनगरी ढोलांच्या निनादात सोमवारी महापालिकेतील भाजप पर्वाला सुरूवात झाली. महापौर, उपमहापौर व गटनेत्यांनी मिरवणुकीने जाऊन महापालिकेच्या कारभाराची सूत्रे घेतली. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच नूतन पदाधिकाºयांसाठी मुख्यालयात रांगोळी काढून, फुलांच्या पायघड्याही घालण्यात आल्या होत्या.महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पराभव ...

सांगली : पावसाच्या कोसळणाऱ्या सरी, फटाक्यांची आतषबाजी, तसेच नाशिक व धनगरी ढोलांच्या निनादात सोमवारी महापालिकेतील भाजप पर्वाला सुरूवात झाली. महापौर, उपमहापौर व गटनेत्यांनी मिरवणुकीने जाऊन महापालिकेच्या कारभाराची सूत्रे घेतली. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच नूतन पदाधिकाºयांसाठी मुख्यालयात रांगोळी काढून, फुलांच्या पायघड्याही घालण्यात आल्या होत्या.महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पराभव करीत सत्ता मिळवली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष भाजपने साजरा केला नव्हता. महापौर, उपमहापौर निवडीही अत्यंत साधेपणाने पार पाडल्या होता. ही सारी कसर भाजपने सोमवारी विजयाच्या मिरवणुकीने भरून काढली. स्टेशन चौक ते महापालिकेपर्यंत जल्लोष करीत भाजपचे नेते, कार्यकर्ते आले.महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी व सभागृह नेते युवराज बावडेकर यांची उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, भगवानराव साळुंखे, दीपकबाबा शिंदे, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, सुरेश आवटी, प्रकाश बिरजे सहभागी झाले होते.मिरजेचे मुला-मुलींचे आकर्षक ढोलपथक, तसेच बिरदेव ग्रुपच्या धनगरी ढोलपथकाच्या निनादात मिरवणुकीला सुरूवात झाली. अधुनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यातच फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. महापालिकेत मिरवणूक आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर आ. गाडगीळ यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महापौर, उपमहापौर व गटनेत्यांच्या पदग्रहणाचा समारंभ झाला.पाटील गैरहजर : बापट यांची हजेरीभाजपच्या पदग्रहण समारंभाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार होते. पण व्यस्त कार्यक्रमांमुळे ते येऊ शकले नाहीत. पण भाजपचे दुसरे मंत्री गिरीश बापट मात्र आवर्जून उपस्थित होते. बापट हे एका कार्यक्रमासाठी सांगलीत आले होते. त्यांनी महापालिकेत येऊन महापौर, उपमहापौर व गटनेत्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, माजी नगरसेविका स्वरदा केळकर उपस्थित होत्या.महापालिका भगवेमयया मिरवणुकीत भाजपचे पदाधिकारी, नेतेमंडळी भगवा शर्ट, भगवे फेटे घालून, तर महिला सदस्या भगव्या साड्या, भगवे फेटे घालून सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे महापालिकेतील वातावरण भगवेमय झाले होते.