सांगली महापालिका निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादीला भाजपाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:54 PM2018-07-22T23:54:30+5:302018-07-22T23:55:30+5:30

र्वच पक्षांत बंडखोरी झाली आहे. तब्बल ३५ अपक्षांनी एकत्र येत आघाडीची मोट बांधली आहे.

Sangli municipal elections: BJP's challenge to Congress-NCP candidate | सांगली महापालिका निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादीला भाजपाचे आव्हान

सांगली महापालिका निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादीला भाजपाचे आव्हान

googlenewsNext

- श्रीनिवास नागे

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपाची घोडदौड रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. शिवसेना, स्वाभिमानी विकास आघाडी आणि शहर सुधार समितीही मैदानात असली तरी सर्वच पक्षांत बंडखोरी झाली आहे. तब्बल ३५ अपक्षांनी एकत्र येत आघाडीची मोट बांधली आहे. त्यामुळे काँग्रेसपुढे सत्ता राखण्याचे, तर भाजपापुढे चांगली कामगिरी करण्याचे आव्हान आहे.
१ आॅगस्टला मतदान ३ तारखेला मतमोजणी होईल. २० प्रभागांतील ७८ जागांसाठी ४५१ उमेदवार रिंगणात आहेत. महाआघाडीची पाच वर्षे वगळता १५ वर्षे काँग्रेसचे दिवंगत नेते मदन पाटील यांच्या गटाकडे सत्ता आहे. मदन पाटील आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या आकस्मिक निधनामुळे आता काँग्रेस सामूहिक नेतृत्वाखाली लढत आहे. आमदार विश्वजित कदम, मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री, वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्याकडे निर्णयाचे अधिकार असून, त्यांनी राष्टÑवादीच्या हाकेला प्रतिसाद देत आघाडी केली आहे. काँग्रेसला
४० तर राष्टÑवादी २९ जागा लढवत आहे. पाच जागांवर या दोन पक्षातच मैत्रीपूर्ण लढत आहे. राष्टÑवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जयंत पाटील यांची जिल्ह्यातील ही पहिलीच निवडणूक आहे.
माजी आमदार संभाजी पवार गटाने शिवसेनेशी सवतासुभा घेत स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महापलिकेतील भ्रष्टाचारावर आवाज उठवणाऱ्या शहर सुधार समितीचे शिलेदारही लढत देत आहेत. सत्तेच्या या सारीपाटावर उत्कंठा वाढवत ३५ अपक्षांनी आघाडी केली आहे.

भाजपा सर्व ७८ जागा लढविणार
एक खासदार, चार आमदारांच्या जोरावर भाजपाने जिल्हा परिषद जिंकल्यानंतर आता महापालिकेची सत्ता खेचण्यासाठी मोठी फौज कामाला लावली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे नेतृत्व असून खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे त्यांच्या साथीला आहेत. भाजपा सर्व ७८ जागा लढवत आहे.

Web Title: Sangli municipal elections: BJP's challenge to Congress-NCP candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.